'नमस्ते इंग्लंड' सिनेमाचं पंबाजमधील शूटिंग पूर्ण, अर्जुनने परिणितीला म्हटलं...

Apr 02, 2018, 16:37 PM IST
1/5

Namaste England

Namaste England

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोपडाने आपल्या आगामी 'नमस्ते इंग्लंड' सिनेमासाठी पंजाबमधील शूटिंग पूर्ण केलं आहे. अर्जुनने रविवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओत तो विमानात असल्याचं दिसत आहे.

2/5

Namaste England

Namaste England

"घरी परतण्याची वेळ झाली आहे. 'नमस्ते इंग्लंड'चं शेड्यूल पूर्ण झालं. परिणिती आता माझी आठवण काढू नकोस... जशी तू नेहमी काढत असते" असं अर्जुनने म्हटलयं.

3/5

Namaste England

Namaste England

यानंतर परिणितीने इंस्टाग्रामवर एक नोट लिहित म्हटलं, "नमस्ते इंग्लंड सिनेमासाठी पंजाबमध्ये करण्यात येणारं शूटिंग पूर्ण झालं." 

4/5

Namaste England

Namaste England

विपुल अमृतलाल शाह यांच्याद्वारे दिग्दर्शन आणि निर्मित असलेल्या 'नमस्ते इंग्लंड' या सिनेमात एक प्रेम कथा आहे.

5/5

Namaste England

Namaste England

'नमस्ते इंग्लंड' हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूर आणि परिणिती यांनी यापूर्वी 'इशकजादे' सिनेमात एकत्र काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य: अर्जुन कपूर इंस्टाग्राम)