AC वापरताना तुम्हीही या चुका करु नका; संपूर्ण उन्हाळा पश्चातापात निघून जाईल

उन्हाळा सुरु होताच घऱांमध्ये बंद असलेले एसी सुरु होतात. पण हे एसी वापरताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा महागडे एसी लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

Apr 17, 2024, 16:31 PM IST

उन्हाळा सुरु होताच घऱांमध्ये बंद असलेले एसी सुरु होतात. पण हे एसी वापरताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा महागडे एसी लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

1/9

सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एसी प्रत्येकाची मुलभूत गरज झाली आहे. घरी असो किंवा ऑफिस एसीचा सर्रास वापर केला जात आहे.   

2/9

पण एसी वापरल्यानंतर येणारं वीज बिल अनेकांची चिंता वाढवणारं असतं. अशा स्थिती एसी जास्त काळ आणि चांगल्या स्थितीत चालावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.  

3/9

दरम्यान अशा काही चुकांबद्दल जाणून घ्या ज्या तुमचा महागडा एसी खराब करु शकतात. तसंच वीज बिलही वाढीव येईल.   

4/9

एसी वापरताना त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. एसी फिल्टर्स नियमितपणे स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ते नक्की स्वच्छ करा.   

5/9

एसीचे फिल्टर जास्त खराब झाल्यास चांगली हवा आणि गारवा देऊ शकत नाहीत. यासह एसीच्या कुलिंग कॉइलमध्ये लीकेज होऊ शकतो. हे खराब झाल्यास येणारा खर्च जास्त असतो.  

6/9

एसी लावताना त्याच्या आऊटडोअर युनिटवर ऊन पडणार नाही याची काळजी घ्या. अशाने कुलिंग कमी होतं.   

7/9

एसीला एकदम कमी तापमानात सेट करुन चालवू नका. यामुळे एसीसाठी जास्त वीज वापरली जाते. यामुळे वीज बिलही जास्त येतं.   

8/9

घरासाठी नवा एसी खरेदी करताना नेहमी आकार आणि क्षमता याकडे लक्ष द्या. आपल्या रुमच्या साईजनुसार टन ठरवा.   

9/9

एसीची प्रत्येक ऋतुत दोनवेळा सर्व्हिस करायला हवी. तसंच हिवाळ्यानंतर जेव्हा एसी वापरण्यास सुरुवात करता तेव्हा त्याची सर्व्हिसिंग नक्की करा.