PHOTO : प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यकिरणांची मोहोर; रत्नजडित वस्त्रानं सजलेल्या रामलल्लाचं मनमोहक रुप पाहाच

Ayodhya Ram Navami Surya Tilak: अयोध्यातील राम मंदिरात तब्बल 500 वर्षांनी रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येतो. रामनवमीचा अद्भूत आणि अविस्मरणीय असा सूर्यतिलकाचा सोहळा संपन्न झाला. 

Apr 17, 2024, 13:21 PM IST
1/7

श्री राम यांच्या जन्म पौराणिक कथेनुसार दुपारी 12 वाजता झाला. त्या मुहूर्तावर अयोध्येतील रामलल्लाच्या मस्तकावर 4 मिनिटांसाठी सूर्यतिलकाची मोहोर उमटवण्यात आली. 

2/7

हे नयनरम्य दृश्य पाहून भक्तांच्या डोळात पाणी आणि अंगावर शहारा आला. असंख्य राम भक्तांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवली. 

3/7

या अद्भूत सोहळ्यासाठी घुमटाच्या गवाक्षातून किरणांची दिशा अचूक राहावी म्हणून ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा उपयोग करण्यात आला. 

4/7

रामलल्ला यांच्यावर दरवर्षी रामनवमीला दुपारी 12 वाजता सूर्यतिलक करण्यात येणार आहे. 

5/7

अध्यात्म आणि विज्ञानाच्या संगमाचे हे विहंगम दृश्य आज जगाने अनुभवलं. 

6/7

रामनवमी निमित्त रामलल्ला यांना सोन्याचे दागिने आणि रत्नांनी जडलेला पिवळा आणि गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करण्यात आला. 

7/7

प्रभू श्री रामाचा जन्म अभिजित मुहूर्तावर कर्क राशीत झाला होता. त्यानुसार दुपारी 12.17 मिनिटांनी रामाच्या मूर्तीचा अभिषेक करुन पाळणा हलवण्यात आला.