विशेष बालकांसाठी खास Barbie; कंपनीच्या या निर्णयाचं जगभरात कौतुक

Barbie : अतिशय सुरेख, नजर रोखणारी, लांबसडक आणि मऊसूत केस असणारी ही बाहुली अनेकांसाठी बार्बी या नावानं ओळखीची. आता हीच बार्बी एका नव्या रुपात समोर आली आहे.   

Apr 26, 2023, 14:09 PM IST

Barbie : लहानपणापासूनच काही खेळणी आपल्या अतिशय आवडीची असतात. मुलींसाठी या आवडीच्या खेळण्यांमध्ये पहिला क्रमांक येतो तो म्हणते इवल्याच्या, नाजूकशा बाहुलीचा. 

1/7

बार्बी

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

तिचं हे नवं रुप सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, Mattel या खेळणी- बाहुले- बाहुल्या तयार करणाऱ्या कंपनीनं अमेरिकेतील National Down Syndrome Society च्या मदतीनं थेट  Down Syndrome असणाऱ्या बालकांसाठी ही बार्बी तयार केली आहे.   

2/7

बार्बीचं नवं रुप

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

विशेष बालकांच्या अनुषंगानं या नव्या बार्बीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बार्बीची उंची आणि तिची अंगकाठी लगेचच लक्ष वेधत आहे. या नव्या बार्बीची उंची कमी ठेवण्यात आली आहे. 

3/7

लहानसे कान आणि लहानसं नाक

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

नव्या बार्बीच्या चेहऱ्याचा आकार गोलाकृती असून, बदामाच्या आकाराचे डोळे तिला देण्यात आले आहेत. लहानसे कान आणि लहानसं नाक असं तिचं एकंदर रुप आहे. 

4/7

तळहातावरही एकच रेष

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

बाहुलीच्या तळहातावरही एकच रेष असून, विशेष बालकांमध्ये दिसणाऱ्या काही गुणांना इथं अधोरेखित करण्यात आलं आहे. 

5/7

बार्बीचा लूक

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

बार्बीला फुगीर बाह्यांचा, फुलपाखरं आणि फुलांची निळ्या पिवळ्या रंगाची नक्षी असणारा, एक फ्रॉक देण्यात आला आहे. हे रंग Down’s syndrome जनजागृतीचं प्रतीक आहेत. 

6/7

आश्चर्याची बाब म्हणजे...

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीकडून ही नवी बार्बी साकारताना अनेक बारकावे अचूकपणे टीपण्यात आले आहेत. ज्याचं संपूर्ण जगातून कौतुक होताना दिसत आहे. 

7/7

(सर्व छायाचित्र - Barbie/ instagram)

Barbie for down syndrome affected kids Mattel launches new product

बार्बीमध्ये स्वत:ला पाहण्यासाठी बालकांना प्रेरित करणं हा आपला हेतू असून, त्यांनी तिच्यासारखं दिसण्याची अपेक्षा करू नये, तिच्यासोबत खेळावं, तिला आपल्यासारखंच वागवावं हा हेतू Mattel कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला. (सर्व छायाचित्र - Barbie/ instagram)