Holi 2024 Vastu: धनलाभ होण्यासाठी होळीच्या शुभमुहूर्तावर घरी 'या' वस्तू घरी आणा, आर्थिक समस्या होईल दूर

हिंदू शास्त्रात होळीच्या सणाला मोठे महत्त्व प्राप्त आहे. जाणून घेऊयात वास्तूशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घरात कोणत्या वस्तू आणल्याने वास्तूदोष दूर होतो.  

Mar 17, 2024, 14:31 PM IST

वास्तू शास्त्रानुसार होळीचा सण हा शुभ मुहुर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

1/6

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. पंचागांनुसार 24 मार्चला रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून ते रात्री 12 वाजून 27 मिनिटांपर्यंतचा शुभ मुहुर्तावर होलिका दहन करण्यात यावं असं सांगितलं जातं. 

2/6

आंब्याच्या पानांचं तोरण

शुभ कार्यासाठी आंब्याच्या पानांना हिंदू धर्मात मानाचं स्थान दिलं जातं.सणावाराला आंब्याच्या पानांचं तोरण दारावर लावलं जातं. होळीच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने घरात सकरात्मक ऊर्जा निर्माण होते. 

3/6

बांबूचं रोप

असं म्हणतात की,  बांबूचं रोप लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. बांबूचं रोप सुख-शांतीचं प्रतिक मानलं जातं. होळीच्या दिवशी बांबूचं रोप लावल्याने घरातील वास्तूदोष दूर होतो.   

4/6

धातूचा कासव

हिंदू मंदिरात प्रवेशद्वारावर धातूचा कासव ठेवला जातो. धातूचा कासव हा प्रगती दर्शवतो.त्यामुळे होळीच्या दिवशी धातूचा कासव घरी आणणं शुभ मानलं जातं. 

5/6

चांदीचा शिक्का

देवी लक्ष्मीला सुखं संपत्तीचं प्रतिक मानलं जातं. हिंदूशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चांदीचा शिक्का आणि तांदूळ लाल कपड्यात बांधून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

6/6

विंडचाईम

सुशोभिकरणासाठी अनेकजण विंडचाईम घरी आणतात. 5, 7 किंवा 11 स्टीकच्या विंडचाईम होळीच्या दिवशी घरी आणावं. असं म्हटलं जातं की, विंडचाईमच्या मधुर आवाजाने घरातील वाद कलह दूर होतात.         ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )