Sarkari Naukri : Officer पदासाठी नोकरीची संधी; सरकारच्या 'या' विभागात 11 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती

Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमची ही शोधमोहिम इथं येऊन थांबू शकते. कारण इथं एकाच क्लिकवर तुम्हाना नोकरीच्याच्या सर्व अटींची माहिती मिळण्यासोबत नेमका अर्ज कुठं आणि कसा करायचा याबबातची माहितीसुद्धा मिळणार आहे

Jan 07, 2023, 08:51 AM IST

Sarkari Naukri : सातवा आणि आठवा वेतन आयोग, सर्व सरकारी सुविधा आणि सुट्ट्या.... आणखी काय हवं? पाहा या नोकरीसाठी काय आहे वयोमर्यादा आणि शिक्षणाची अट 

1/5

bsnl recruitment 2023 for Jto Recruitment Junior Telecom Officer Post jobs Vacancy read details

BSNL Recruitment 2023 : दर दिवशी आपल्या मनाजोगी सरकारी नोकरी शोधत तुम्हीही अनेक संकेतस्थळांना भेट देत आहात का? चांगला पगार, सुट्ट्या आणि चांगलं पद या तुमच्या सर्वच निकषांची आणि हव्याहव्याशा नोकरीची पूर्तता आता एका सरकारी विभागाकडून करण्यात येणार आहे. 

2/5

bsnl recruitment 2023 for Jto Recruitment Junior Telecom Officer Post jobs Vacancy read details

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर या पदासाठी आता भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. BSNL च्या संकेतस्थळावर यासंबंधीची सर्व माहिती देण्यात आली आहे. 

3/5

bsnl recruitment 2023 for Jto Recruitment Junior Telecom Officer Post jobs Vacancy read details

ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर या पदासाठी इथं तब्बल 11 हजार 705 जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावेत. त्यांच्याकडे इंजिनयरिंग क्षेत्रातील पदवी असणंही महत्त्वाचं. 20 ते 30 वयोगताली उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. 

4/5

bsnl recruitment 2023 for Jto Recruitment Junior Telecom Officer Post jobs Vacancy read details

अर्ज करताना खुल्या गटासाठी 1 हजार रुपये तर, आरक्षित एससी आणि एसटी गटासाठी 500 रुपये इतरं शुल्क आकारण्यात येईल. परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकिय तपासणी अशा प्रक्रियेनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे. 

5/5

bsnl recruitment 2023 for Jto Recruitment Junior Telecom Officer Post jobs Vacancy read details

या पदासाठी अर्ज करताना बायोडेटा/ रेझ्युमे, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा आणि जातीचा दाखला (लागू असल्यास), आधार आणि पॅनकार्ड, पासपोर्टसाईज फोटो अशा गोष्टी अनिवार्य असतील.