राज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम

Maharashtra Travel News : सध्याच्या घडीला अशीच एक अद्भूत गोष्ट राज्याला मिळालेला वारसा आणखी समृद्ध करताना दिसत आहे.   

May 21, 2024, 11:41 AM IST

(Maharashtra Travel News) महाराष्ट्रात आजवर पुरातत्वं खात्यानं उत्खननाच्या माध्यमातून बऱ्याचदा अशा काही गोष्टी जगासमोर आणल्या आहेत ज्या पाहताना भारावल्यावाचून इतर कोणताही भाव चेहऱ्यावर येत नाही. 

 

1/7

शिवमंदिर

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : नुकतंच राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात शिवमंदिराचा शोध लागला. अत्यंत सुबक नक्षीकाम असलेल्या दगडी चौकटी आणि गर्भगृहात मोठी शिवपिंड असे अवशेष सापडल्यामुळं हे मंदिर चर्चेचा विषय ठरत आहे. (ancient shiva temple found during excavations in Buldhana Sindakhed raja)

2/7

सिंदखेडराजा

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून सिंदखेडराजा या ठिकाणाकडे पाहिलं जातं. इथं राजे लखुजीराव जाधव यांनी अनेक वर्षे आपली राजवट चालवली असं म्हटलं जातं. 1629 मध्ये लखुजीराव जाधव यांची दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर हत्या करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार शहराच्या पश्चिम भागात असलेल्या रामेश्वर मंदिराशेजारील परिसरातच त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.   

3/7

मंदिरवजा समाधी?

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

पुढे 1630 नंतर त्यांच्या समाधीस्थळाचं बांधकाम सुरु झालं आणि जवळपास 10 वर्षांनंतर ही मंदिरवजा समाधी उभारून पूर्ण झाली. आतापर्यंतच्या नोंदींनुसार ही देशातील हिंदुराजाची आतापर्यंतची सर्वात मोठी दगडी समाधी म्हणून ओळखली जाते. याच भागात मागील अनेक  दिवसांपासून शहराच्या ऐतिहासिक वास्तू संवर्धन आणि जतन करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं.   

4/7

शिवपिंड

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

दरम्यान संवर्धन कामातच केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत खोदकाम सुरू असताना इथं समाधी चौथऱ्यापासून पाच फूट खोल आणि समाधी मंदिरापासून जवळपास 20 फुटांच्या अंतरावर मोठी शिवपिंड आढळली. पुढे आणखी खोदकाम केलं असता या शिवपिंडीवर आणि आजुबाजूला सुबक नक्षीकामाचेही नमुने आढळले. लक्ष वेधून गेली ती म्हणते तिथं असणारी दगडी चौकट.   

5/7

प्राथमिक अंदाज

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

सध्या हे अवशेष म्हणजे पुरातन शिव मंदिरच असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण टीमनं बांधला आहे. एकिकडे या मंदिरानं नदरा वळवलेल्या असतानाच दुसरीकडे मात्र समाधी परिसरात सापडल्यामुळं शिवपींड/ तत्सम अवशेष हे तत्कालीन राजघराण्यातील मोठ्या व्यक्तीची समाधी असण्याची शक्यता जाणकारांनी अधोरेखित केली आहे.   

6/7

प्रतीक

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

राजे लखुजीराव जाधवांच्या समाधीपाशीही पुरातन शिवपिंड पाहायला मिळते. तिथंच असलेल्या तत्कालीन महिलांच्या समाधीवर बांगड्या घातलेला महिलांचा उजवा हात पाहता त्या काळात सती जाणाऱ्या महिलांसाठी हे प्रतीक असावं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. थोडक्यात हे मंदिर आहे की समाधी याची उकल अद्याप होऊ शकेलली नाही.   

7/7

स्थानिकांची गर्दी

Buldhana Sindakhed raja ancient shiva temple found during excavations photos viral

सिंदखेडराजा आणि नजीकच्या भागात ज्यावेळी या पुरातन अवशेषांविषयीची माहिती मिळाली तेव्हा स्थानिक नागरिक आणि जवळपासच्या खेड्यांमधून अनेकांनीच या भागाला भेट दिली. याबाबत शहरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मंदिर सदृश्य अवशेष पाहण्यासाठी गर्दी केली.