Buisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, कराल उत्तम कमाई

 उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.

| Mar 22, 2024, 20:24 PM IST

Business Idea: उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.

1/7

Buisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, नोकरीपेक्षा कराल उत्तम कमाई

Business Idea Startup in summer earn better than job

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बहुतांश लोकांसाठी ही त्रासदायक बाब असली तरी तुम्ही या संधीचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विचार करु शकता. नव्या व्यवसायाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आयडीया खूप फायदेशीर ठरेल.

2/7

भरपूर कमाई करू शकता

Business Idea Startup in summer earn better than job

हा व्यवसाय उन्हाळ्यात सुरू करुन तुम्ही भरपूर कमाई करू शकता. आपण आइस क्यूब बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आइस क्यूबचा कारखाना उभा करावा लागेल. हा आइस क्यूब व्यवसाय उन्हाळ्याच्या हंगामात चांगलाच फायदेशीर ठरतो. 

3/7

व्यवसायातून भरपूर पैसे

Business Idea Startup in summer earn better than job

उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात. या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

4/7

व्यवसायाची नोंदणी करा

Business Idea Startup in summer earn better than job

आईस क्यूब व्यवसाय  सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. सर्वात आधी तुमच्या जवळच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल.नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला आइस क्यूब व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रीझर आणि इतर गोष्टी खरेदी कराव्या लागतील. सर्वात महत्वाचं म्हणजे विजेची सोय असलेल्या ठिकाणाची यासाठी निवड करा.

5/7

एक लाख रुपये खर्च

Business Idea Startup in summer earn better than job

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे एक लाख रुपये खर्च येईल. तसेच व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याचे चांगले मार्केटिंग करावे लागेल.

6/7

दरमहा 30 हजार

Business Idea Startup in summer earn better than job

तुमचा व्यवसाय सुरुवातीपासून चांगला चालला तर तुम्ही दरमहा 30 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

7/7

आइस्क्रीम विकू शकता

Business Idea Startup in summer earn better than job

व्यवसायाची पोहोच वाढवण्यासाठी परिसरातील आइस्क्रीमची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फळांच्या दुकानदारांशी संपर्क साधून तुमचे आइस्क्रीम विकू शकता.