मराठीत 'चहा', इंग्रजीत 'टी' मग हिंदीत काय म्हणतात? 99% चहाप्रेमींचं ही उत्तर चुकणार

Tea Lovers : आपल्यापैकी कित्यकेजणांसाठी चहा म्हणजे जीव की प्राण असेल. चहाच्या टपरीवर एक कप चहा द्या, एक कटिंग द्या, किंवा एक कप टी.. असं फार ऐकायला मिळेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? मराठीत चहा म्हणतात, इंग्रजीत टी  मग हिंदीमध्ये चहाला काय म्हणतात. अनेकजणांचा असा समज आहे की, हिंदीत चाय असं म्हणतात. पण हे चुकीचे उत्तर आहे. 

Apr 14, 2024, 13:20 PM IST
1/7

जगभरातील बहुतेक लोकांना एक कप चहा प्यायला फार आवडतो. सकाळ असो वा संध्याकाळ, लोक चहा पिणे कधीच बंद करत नाहीत. भारतात अनेक चहाप्रेमी आहेत. पण याच चहाला हिंदीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय का? 

2/7

चहाला  मराठीत चहा, इंग्रजीत टी आणि हिंदीत चाय म्हणतात. असा  सर्वांचा समज आहे. पण चाय हा मूळचा हिंदी शब्द नसून तो चायनीज भाषेतून घेण्यात आला आहे.

3/7

चीनचा राजा शेंग नुंग यांन चहा या पेयाचं नाव चा-या असं ठेवलं होतं. तेच नाव पुढे चाय असं झालं.

4/7

म्हणजे चाय हा शब्द हिंदी नसून, चायनीज भाषेतल्या चा-आ यावरुन आलाय. तर दुसरीकडे इंग्रजीमध्ये ही टी हा शब्द मूळ नाही. 

5/7

चीनमधलच्या मिन चीनी या आणखी एक भाषेवरून तो आलाय. त्या भाषेत चहाला टे किंवा टी असं म्हणतात. त्याचाच आधार घेऊन पुढे इंग्रजी भाषेत टी हा शब्द रूढ झाला.  

6/7

केवळ चहाच नाही, तर अनेक शब्दांचं मूळ इतर भाषांमध्ये असतं. सततच्या वापरामुळे ते शब्द त्या भाषेत रूढ होतात. चाय या शब्दाचंही तसंच आहे. मग चहाला हिंदीमध्ये काय म्हणतात माहीत आहे का? 

7/7

खरं तर याचं नेमकं असं काही उत्तर नाही. चहा ज्या प्रकारे तयार केला जातो, त्या पद्धतीवरून त्याला काही नावं पडली आहेत. उदा. ‘दुग्ध जल मिश्रित शर्करायुक्त पर्वतीय बुटी’ असं एक हिंदी नाव चहाला आहे. तसंच उष्णोदक असंही त्याला म्हटलं जातं. काही तज्ज्ञांच्या मते मात्र चहाचं हिंदी नाव ‘चाय’ असंच आहे.