650Km रेंज, 37 मिनिटांत होणार चार्ज, 10 एअर बॅग असलेली सुपर सेफ कार लाँच; जाणून घ्या किंमत

ऑटोमोबाईल मार्केटमध्ये  चिनी कार उत्पादक कंपनीने आपली नविन इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे. 

Mar 05, 2024, 17:16 PM IST

BYD Seal Electric Car : बिल्ड युवर ड्रीम (BYD) या चिनी कार उत्पादक कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. BYD Seal असे या Electric Car चे नाव आहे. की कार सुपर सेफ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जाणून घेवूया या कारचे फिचर्स आणि किंमत.

 

1/7

 बिल्ड युवर ड्रीम (BYD) या चिनी कार उत्पादक कंपनीने आपली नवी   इलेक्ट्रिक कार  इंडियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. 

2/7

चीनमधून ही कार आयात करावी लागत असल्याने भारतात याची किंमत जास्त आहे. यामुळे भारतातच याची निर्मीती करण्यासाठी कंपनीने प्रस्ताव दिला आहे. मात्र, यावर निर्णय झालेला नाही. 

3/7

या कारची स्टार्टिंग प्राईज 41 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 53 लाख रुपये आहे.  

4/7

अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) हिल होल्डसह 8-वे इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, 360-डिग्री कॅमेरा असे अनेक फिचर्स या कारमध्ये मिळतात.  

5/7

या कारमध्ये बेसिक व्हेरिएंटमध्ये 61.44kWh चा बॅटरी पॅक तर उच्च व्हेरियंटमध्ये 82.56kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. बॅटरी 37 मिनिटांत चार्ज होते. सिंगल चार्जमध्ये 650Km रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे. 3.8 सेकंदात कार  0-100 किमी इतका स्पीड पकडते. 

6/7

BYD Seal  ही सुपर सेफ कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात 10 एअरबॅग्ज आहेत. या कारला  युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. 

7/7

BYD कंपनीने भारतात लाँच केलेली ही तिसरी इलेक्ट्रीक कार आहे. याआधी कंपनीने e6 MPV आणि Atto 3 SUV या कार लाँच केल्या आहेत.