एप्रिल आणि मेच्या कडक उन्हाळ्यात 'या' थंड आणि मनमोहक ठिकाणांना द्या भेट

एप्रिल-मे मध्ये लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखील असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. 

| Apr 07, 2024, 06:30 AM IST

Coolest places in India: एप्रिल-मे मध्ये लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखील असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. 

1/7

एप्रिल आणि मेच्या कडक उन्हाळ्यात 'या' थंड आणि मनमोहक ठिकाणांना द्या भेट

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

Coolest places in India:एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा जाणवू लागतात. मे महिन्यात तर उकाडा आणखीनच वाढतो. या काळात लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखी असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. 

2/7

भरमौर

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

  हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात वसलेले हे सुंदर ठिकाण आहे.  माचू पिचू किंवा ब्रह्मपुरा या नावानेही हे ओळखले जाते. अगदी उष्ण उन्हाळ्यातही, येथील तापमान 15°C ते 20°C दरम्यान राहते. हे हिमाचलमधील सर्वात शांत आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. 

3/7

कीलाँग

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले केलॉन्ग हे एकदा तरी पाहावे  असे ठिकाण आहे. अनेक परदेशी ठिकाणेही कीलॉंगच्या सौंदर्याच्या तुलनेत फिकी पडतात. हिमाचलच्या सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी हे एक आहे.बर्फाच्छादित पर्वत, तलाव, धबधबे आणि थंड हवेच्या झुळूकांमध्ये तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. येथे तुम्ही आईस-स्केटिंग, ट्रेकिंग, राफ्टिंगही करू शकता. 

4/7

मुरंग

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

उंच पर्वत, गवताळ प्रदेश, तलाव, धबधबे आणि देवदाराची मोठी झाडे अस एकत्र पाहायची संधी तुम्हाला मुरंगमध्ये मिळेल. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हातही येथील तापमान सामान्य राहते. 

5/7

जिस्पा

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये असलेले जिस्पा हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. जिस्पाच्या सुंदर खोऱ्यांना एकदा भेट दिलात तर तुम्हाला नक्कीच येथे राहावेसे वाटेल. जिस्पाला हिमाचलमध्ये लपलेला खजिना  असं म्हणतात. 

6/7

उदयपूर

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

केलॉन्गपासून 53 किमी अंतरावर आणि चंद्रभंगा नदीच्या काठी उदयपूर वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून 2 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. एप्रिलच्या कडक उन्हातही येथील तापमान 8°C ते 10°C दरम्यान राहते.

7/7

या ठिकाणंही करा एक्स्प्लोअर

Coolest places in India During Summer Vaccation Marathi News

एप्रिल आणि मेच्या कडक उन्हात तुम्ही हिमाचल प्रदेश एक्स्प्लोअर करायला गेला असाल तर अनेक ठिकाणं तुमची वाट पाहत आहेत. डलहौसी, कारसोग, जिभी, सराहान आणि काझा यासारखी अद्भुत ठिकाणांना भेट देऊन तुमची ट्रीम स्मरणीय करु शकता.