भारत-पाकिस्तान महा मुकाबल्यासाठी न्यूयॉर्कचं स्टेडिअम तयार, समोर आला पहिला व्हिडिओ

T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर आता टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. क्रिकेट प्रेमींना या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानचा हा सामना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी न्यूयॉर्कचं हे स्टेडिअम आता पूर्णपणे तयार झालं आहे.

May 16, 2024, 21:28 PM IST

T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर आता टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. क्रिकेट प्रेमींना या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानचा हा सामना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी न्यूयॉर्कचं हे स्टेडिअम आता पूर्णपणे तयार झालं आहे.

1/7

2 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीय. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी स्टेडिअम्सही पूर्ण पणे तयार झालेत. या स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्याकडे.

2/7

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जूनला खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध दोन हात करेल. त्यानंतर 9 जूनला टीम इंडियाचा दुसरा सामना असेल. या सामन्यात सामन्यात टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडेल.

3/7

भारत-पाकिस्तानचा हा सामना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. हे स्टेडिअम आता पूर्णपणे सज्ज झालंय. या स्टेडिअमची झलक दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

4/7

नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता 34,000 प्रेक्षकांची आहे. या स्टेडिअममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रास कव्हरचा वापर करण्यात आला आहे. क्रिकेटमधल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्टेडिअमची खेळपट्टी बनवण्यात आलीय.

5/7

नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिअम तयार झाल्यानंतर हे क्षण यादगार बनवण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने सहभाग घेतला आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील दिग्ज सर कर्टली एम्ब्रोस (वेस्ट इंडिज), शोएब मलिक (पाकिस्तान) आणि लियाम प्लंकेट (इंग्लंड) उपस्थित होते.

6/7

न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिअमवर एकूण 8 सामने खेळवले जाणार आहेत. यातला पहिला सामना 3 जूनला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यान खेळवला जाणार आहे. तर 5 जूनला भारत विरुद्ध आयर्लंड सामना रंगेल. 9 जूनला भारत पाकिस्तान आणि 12 जूनला भारत वि. अमेरिका सामना खेळवला जाणार आहे. 

7/7

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांनी भाग घेतला आहे. प्रत्येकी पाच संघाचे चार ग्रुप तयार करण्यात आले आहेत. भारताचा ग्रुप ए मध्ये समावेश असून पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका संघांचा समावेश आहे.