IPL 2023 : बिग बींचा आवाज, 12 भाषा आणि बरेच काही.... आयपीएल 2023 प्रेक्षकांसाठी ठरणार खास

IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान कसोटी (India vs Australia Test Series) मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) रंगणार आहे. पण आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL 2023). आयपीएलचा हा सोळावा हंगाम असून यंदा दहा संघ खेळणार आहेत. यंदा खेळाडूंची अदलाबदल झाली असून कोणते खेळाडू कोणत्या संघातून खेळणार हेही निश्चित झालं आहे. पण यंदाची आयपीएल प्रेक्षकांसाठीही खास असणार आहे. बीसीसीआय (BCCI) आणि जिओने (JIO) या स्पर्धेत मोठे बदल केले आहेत.

Feb 22, 2023, 16:49 PM IST
1/6

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023) च्या काऊंटडाऊन सुरु झाला आहे. खेळाडूंच्या लिलावापासून (Players Auction) स्पर्धेच्या वेळापत्रकापर्यंत (IPL Timetable) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता बीसीसीआय या स्पर्धेसाठी पूर्ण सज्ज झालंय.

2/6

आयपीएल 2023 चं वेळापत्रकही बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलंय. यानुसार 31 मार्चला आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होईल आणि 28 मेला आयपीएलची अंतिम फेरी खेळवली जाईल

3/6

यंदाचं आयपीएल प्रेक्षकांसाठीही खास असणार आहे. छोट्या पडद्यावर स्टार स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं प्रसारण होईल. तर डिजीटलवर जिओ सिनेमावर प्रेक्षकांना लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. 

4/6

याशिवाय जिओने स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार तब्बल 12 स्थानिक भाषांमध्ये (Regional Language) आयपीएलचं समालोचन केलं जाणार आहे. 

5/6

IPL 2023 मध्ये काही मजेदार गोष्टींचा सहभाग केला जाऊ शकतो. म्हणजे स्पर्धेदरम्यान क्विजची (Sports Quize) सुरवात होऊ शकते, आणि यासाठी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशिवाय काही बॉलिवूड स्टार्सची (Bollywood Stars)  बोलणं सुरु आहे. 

6/6

जिओ 4K क्वालिटीमध्येही आयपीएलचं प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय जिओ युजर्सना सामन्याचा कॅमेरा अँगलही निवडण्याचं स्वंतत्र्य असणार आहे.