Wolverine आणि Deadpool ला धुळवडीची क्रेझ! AI फोटो आले समोर

आज संपूर्ण भारतात धुळवडी साजरी केली जाते. रंगाता सण असणाऱ्या या दिवशी सगळेत गुलालाच्या रंगात रंगले आहेत. अशात आपले आवडते सुपरहीरो जर होळी खेळतील तर ते कसे दिसतील हे पाहूया... सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत...

| Mar 25, 2024, 18:08 PM IST
1/7

आपल्याला AI जे कधी होण्याची शक्यता नाही किंवा होण्याची शक्यता आहे ते सगळं पाहता येतं. एकीकडे 'डेडपूल अ‍ॅन्ड वुल्‍वरीन' प्रदर्शित होण्याची चाहते प्रतिक्षा करत आहेत. दुसरीकडे त्यांचे धुळवडीचे फोटो समोर आले आहेत. 

2/7

'डेडपूल अ‍ॅन्ड वुल्‍वरीन' यांचे AI नं तयार केले धुळवडीचे फोटो व्हायरल होत आहेत. लाल आणि पिवळ्या सुटमध्ये असलेले त्यांचे हे फोटो एकदा पाहाच.  

3/7

या फोटोत वुल्‍वरीन हा त्याच्या पंज्यांनी डेडपूलला धमकावताना दिसत आहे. तर फोटोच्या बॅकग्राऊंडला भारत दिसत आहे. जिथे लोक आनंदानं धुळवड खेळत आहे. 

4/7

शॉन लेवी दिग्दर्शित 'डेडपूल अ‍ॅन्ड वुल्‍वरीन' हा चित्रपट या वर्षी 26  जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्याची प्रतिक्षा सगळेच करत आहेत. 

5/7

चित्रपटात रेयान रेनॉल्ड्स पुन्हा एकदा अ‍ॅन्टी हीरोच्या अंदाजात डेडपूल होऊन सगळ्यांची मने जिंकताना दिसत आहे. तर जॅकमॅनची वुल्‍वरीनच्या भूमिकेत पुनरागमन होणार आहे.   

6/7

या चित्रपटाच्या 2.25 सेकंदाच्या टीझरमध्ये टाइम वेरिएंस अथॉरिटीला दाखवण्यात आलं आहे. त्यालाच मल्टीवर्स मॅनेजर म्हणतात जे आपल्या सगळ्यांना 'लोकी 2' मध्ये पाहायला मिळालं. 

7/7

यात वेड व‍िल्‍सन उर्फ डेडपूलला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किडनॅप करण्यात येत आणि त्याला मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये घेऊन जाण्यात येतं. (All Photo Credit : Social Media)