ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात

Driving license Test: Driving License:ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करता येतो. पण कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनेक वेळा काही चुकांमुळे अनेकजण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होतात ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

| Jan 22, 2024, 19:41 PM IST

Driving license Test: आजच्या काळात वाहन चालवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. देशातच नव्हे तर जगभरात वाहनांची संख्या वाढत आहे आणि त्यासोबतच वाहन चालवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, सुरक्षित आणि कायदेशीर नियम लक्षात घेऊनच वाहन चालवायला हवे, कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. 

1/7

ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

Driving license Test: आजकाल प्रत्येकजण बाईक किंवा कार घेण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे गाडी चालवणे ही सामान्य गोष्ट बनलीय. पण असुरक्षित गाडी चालवणाऱ्यांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे वाहनांचे नियम माहिती असणे आवश्यक असते.

2/7

ड्रायव्हिंग लायसन्स

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

गाडी चालवण्याआधी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते. त्यासाठी कसा अर्ज करायचा? ही परीक्षा कशी उत्तीर्ण व्हायची? हे अनेकांना माहिती नसते. 

3/7

योग्य रितीने चालवणे

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

गाडी नुसती चालवता येणे आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य रितीने चालवता येणे यात फरक आहे. ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी, गाडी योग्यरित्या चालवता यायला हवी. यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये किंवा इतर कोठही ड्रायव्हिंग शिकू शकता. असे असले तरी ड्रायव्हिंगचा सराव खूप महत्वाचा आहे. खूप सराव केल्याने ड्रायव्हिंग कौशल्ये सुधारतात आणि ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण करणे सोपे होते.

4/7

ड्रायव्हिंग टेस्टचा सराव

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

ड्रायव्हिंग चाचणी दरम्यान प्रशिक्षक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कार चालवण्यास सांगू शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे.

5/7

सराव कराल तीच गाडी घ्या

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

तुम्ही ज्या कारवर सराव केला आहे तिच गाडी टेस्टवेळी घ्या. अन्यथा तुमचा गोंधळ उडू शकतो. त्या गाडीच्या पार्टबद्दल तुम्हाला माहिती झालेली असते.यामुळे वाहन चालवणे आणि चाचणी उत्तीर्ण करणे सोपे होते.

6/7

रिलॅक्स राहा

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

ड्रायव्हिंग चाचणी दरम्यान गोंधळून जाऊ नका. मन शांत ठेवा आणि रिलॅक्स राहा. गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण होण्यास मदत करते.

7/7

गाडीची स्थिती

Driving license Test Simple Tips Auto Marathi News

ड्रायव्हिंग चाचणीसाठी तुम्ही जी कार घ्याल ती योग्य स्थितीत असेल याची काळजी घ्या. गाडीची सर्व कागदपत्रे स्वत:जवळ बाळगा. यासोबतच सर्व महत्त्वाची कागदपत्रेही आपल्याकडे ठेवावीत. यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.