केसांची वाढ आणि केस मजबूत होण्यासाठी या 7 गोष्टी खाव्यात

केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या वाढत चालली आहे.

Oct 20, 2018, 10:44 AM IST

केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या वाढत चालली आहे.

 

1/7

अंडी : अंडी प्रथिने आणि बायोटीनचा एक मोठा स्रोत आहे. हे दोन पोषक घटक केसांच्या वाढीस फायदेशीर असतात. केसांच्या वाढीसाठी पुरेसे प्रोटीन खाणे महत्वाचे आहे. कारण केस हे प्रोटीनपासून बनलेले असतात.

2/7

बेरी : बेरीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. जे वजन वाढवण्यासाठी देखील मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अँटिऑक्सीडेंट गुणधर्म असतात. अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल नावाच्या हानिकारक रेणूंपासून केसांची रक्षा करतात.

3/7

पालक : पालक हे निरोगी हिरव्या भाज्या आहेत ज्यामध्ये फोलेट, लोह आणि जीवनसत्त्वे ए आणि सीसारखे महत्त्वाच पोषक घटक असतात.जे सर्व केसांच्या वाढीस उपयोगी ठरतात.

4/7

फॅटी फिश : सॅल्मन, हेरिंग आणि मॅकेरल सारख्या फॅटी फिशमध्ये पोषक तत्त्व असतात जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे केसांच्या वाढीशी जोडले गेले आहेत.

5/7

रताळे : रताळे कॅरोटीनचा एक मोठा स्रोत आहे. शरीर या मिश्रणास व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते, जे केसांच्या आरोग्यास चांगले आहे.

6/7

काजू : काजू चवदार तर असतातच पण विविध प्रकारच्या पोषक तत्वांपासून बनलेले असतात. जे केसांच्या वाढीस उपयुक्त ठरतात.

7/7

फरस बी : फरस बी मोठ्या प्रमाणात पोषक तत्वांचा पुरवठा करतात. ज्यामध्ये काही प्रमाणात कॅलरी असतात. यातील बरेच पोषकतत्व बाळाच्या वाढीस मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई, जस्त आणि सेलेनियम असल्याने केसांच्या वाढीसाठी मदत होते.