Hanumanji Photo: घरात या दिशेला लावा हनुमानचा फोटो, तुमचे नशिब उजळेल

Vastu Tips for Hanumanji Photo: हिंदू धर्मात लोक घरात देवी-देवतांचे फोटो लावतात. यामध्ये हनुमानाच्या फोटोही असतो. मात्र, हनुमानजींचा फोटो घरात लावताना योग्य दिशेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार देवांची चित्रे लावल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. 

| Nov 19, 2022, 14:45 PM IST
1/5

दक्षिणमुखी हनुमान म्हणजे त्याच्या बसलेल्या आसनाचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. फोटोची दिशा दक्षिणेकडे असल्यास ते शुभ मानले जाते. यामुळे घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही आणि नेहमी सुख-समृद्धी राहते. 

2/5

घरामध्ये डोंगर उचलताना हनुमानजींचा फोटो देखील लावू शकता. यामुळे घरातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच शक्ती आणि धैर्य वाढते. अशा स्थितीत हनुमान पर्वत उचलतानाचा फोटोही घरात लावावा.

3/5

घरामध्ये हनुमानजींचा उत्तराभिमुख फोटोदेखील लावावा. हे फोटो देखील खूप शुभ मानला जातो. हा फोटो घरात लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळूतो. हा फोटो लावल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते.

4/5

घरामध्ये पंचमुखी हनुमानजींचा फोटोही लावू शकता. हे केवळ सर्व अडथळे दूर करत नाही तर जीवनात संपत्ती देखील आणू शकते. हा फोटो मुख्य दरवाजावर लावणे चांगले मानले जाते, जेणेकरून प्रत्येकजण तो पाहू शकेल. या ठिकाणी पंचमुखी हनुमानजींचा फोटो वाईट नजरेपासून रक्षण करते.

5/5

घरामध्ये शुभ्र हनुमानजींचा फोटो लावणे देखील शुभ मानले जाते. शुभ्र हनुमानजीचा फोटो यश मिळवण्यास मदत करते. नोकरीत बढतीसाठी असा फोटो घरात लावावा.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)