तुम्ही चपातीचं उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवता का? मग आताच बंद करा 'ही' सवय

जर तुम्हालाही मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असेल तर ती आताच बदला. कारण फ्रीजमधील हे पीठ तुमच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम करु शकतं.   

Jul 17, 2023, 12:59 PM IST
1/10

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

घरात फ्रीज आल्यानंतर अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत. अन्न, दूध, दही ताजं ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. पण याशिवायही अनेक गोष्टींसाठी फ्रीजचा वापर केला जातो. अनेकदा मळलेलं पीठही उरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं जातं.   

2/10

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

अनेक घरांमध्ये पीठ मळताना ते गरजेपेक्षा जास्त घेतलं जातं. त्यामुळे चपात्या करुन झाल्यानंतर उरलेलं पीठ दुसऱ्या दिवशी वापरण्याच्या हेतूने फ्रीजमध्ये ठेवलं जातं. यामुळे महिलांच्या वेळाचीही बचत होते.  

3/10

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

जर तुम्हालाही मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असेल तर ती आताच बदला. कारण फ्रीजमधील हे पीठ तुमच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम करु शकतं.   

4/10

आजारी पडू शकता

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

पीठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पाहिजे. कारण त्यामध्ये रासायनिक बदल होतात. आणि हेच बदल आरोग्यासाठी घातक ठरतात. अशा पिठाची चपाची खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता.   

5/10

मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू का नये?

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

आयुर्वेदातही पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवू नये असं सांगितलं आहे. शिळ्या पिठापासून बनवलेली चपाती आणि ताज्या पिठाची चपाती यामध्ये फार फरक असतो.   

6/10

पोटाच्या समस्या

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

ओल्या पिठात आंबण्याची प्रक्रिया वेगाने सुरु होते. त्यामुळे त्यात अनेक प्रकारचे जीवाणू आणि घातक रसायने तयार होतात.   

7/10

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

हे बॅक्टेरिया तुमच्या आरोग्याची हानी करु शकतात. शिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने तुम्हाला पोटासंबंधी त्रास जाणवू शकतो.   

8/10

पोट बिघडणे

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

शिळ्या पिठापासून तयार केलेले पदार्थही शिळेच असतात. त्यामुळे तव्यावर गरम भाजलेल्या चपात्या, पुऱ्या किंवा पराठा हे ताजे वाटत असले तरी ते शिळेच असतात. शिळं अन्न खाल्याने पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे हे खाणं टाळा.   

9/10

बद्धकोष्टता

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

चपाच्या गव्हाच्या पीठापासून बनवतात, त्यामुळे ती पचण्यास जड असतो. बद्धकोष्ठता असणाऱ्यांना चपात्या न खाण्याचा सल्ला दिला जातो.   

10/10

Keeping Roti Dough in Fridge can affect on your health

पण जर तुम्ही शिळ्या चपात्या खाल्ल्या तर तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.