...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास

History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.  सर्वात  मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...

Apr 11, 2024, 12:51 PM IST
1/7

मुंबई येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे आणि जुन्या बोरी बंदर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस 1878 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. 

2/7

तर  बोरीबंदर स्टेशन ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. या घटनेला येत्या 16 एप्रिलला 171 वर्षे पूर्ण होतील. 28 नोव्हेंबर 1864 रोजी पश्चिम रेल्वेवर बडोदा ते ग्रँट रोड टर्मिनल (त्यावेळी ग्रँट रोड टर्मिनल होतं) या मार्गावर रेल्वे धावली.

3/7

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर 1866 मध्ये 'बॅक बे' नावाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात आले. हे स्थान आजच्या मरीनलाइन्स रेल्वे स्टेशनच्या जवळ होते.  त्यानंतर या लोकलचा चर्चगेटपर्यंत विस्तार झाला. त्यानंतर बॅक बे स्थानकाची आवश्यकता उरली नसल्याने ते स्थानक बंद करण्यात आले.   

4/7

त्यानंतर इंग्रजकाळात कुलाबा परिसरात सुरुवातीला तीन प्लॅटफॉर्म असलेले कुलाबा स्टेशन समुद्रतळ भरून बांधले गेले. 7 एप्रिल 1896 रोजी सुरु झालेले कुलाबा स्थानकही बंद करण्यात आले. लांबपल्ल्याच्या मेल-एक्ल्प्रेस गाड्या सोडण्यासाठी मुंबई सेंट्रलमध्ये मेनलाईन टर्मिनलची स्थापना करण्यात आली. 

5/7

तसेच ब्रिटीशांच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत बेलार्ड पिअर (मोस स्टेशन) स्थानक होते. या मोल स्टेशनमधून फाळणीच्या आधी थेट पाकिस्तानच्या पेशावर म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत फ्रंटियर मेल धावत होत्या. ब्रिटीशकालीन बेलार्ड पिअर (मोस स्टेशन) स्थानक ही बंद करण्यात आलं.  

6/7

1911 च्या कागदपत्रांच्या आधारे तसेच 12 ऑक्टोबर 1912 रोजी पंजाब मेल दिल्लीहून उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे, पंजाब मेलने 1 जून 1912 पासून बॅलार्ड पिअर्स मॉल स्टेशनवरून पहिला प्रवास सुरू केल्याचे सांगितले जाते. .बॅलार्ड पिअर स्थान आज अस्तित्वात नाही. येथे, अलेक्झांड्रा डॉक आंतरराष्ट्रीय क्रूझसाठी तयार करण्यात आले आहे.

7/7

फ्रंटियर मेलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वातानुकूलित सुविधा आहेत. त्यासाठी ट्रेन वातानुकूलित ठेवण्यासाठी बर्फ ठेवण्यात आला आणि पंख्यांच्या मदतीने थंड हवा पसरवण्यात आली. हा बर्फ वितळला कि पुन्हा दुसऱ्या स्थानकात वितळलेल्या पाण्याचा निचरा करून बॉक्समध्ये नव्या बर्फाच्या लाद्या भरल्या जायच्या.  1934 मध्ये बोगीत थंडावा निर्माण करण्यासाठी बर्फाच्या लाद्या लावणे सुरु केले. त्यामुळे ही भारतातील पहिली एसी बोगी असलेली ट्रेन बनली.