12 वी नंतर सर्वात जास्त पगार मिळवून देणारे टॉप 10 कोर्स!

बारावीनंतर कोणता कोर्स केला तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर असाल टॉप 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया. 

| May 20, 2024, 16:52 PM IST

High Salary Course After 12th: बारावीनंतर कोणता कोर्स केला तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर असाल टॉप 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया. 

1/11

12 वी नंतर सर्वात जास्त पगार मिळवून देणारे टॉप 10 कोर्स!

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

High Salary Course After 12th: बारावीनंतर कोणता कोर्स केला तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर असाल टॉप 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया. 

2/11

डिजीटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

  डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग कोर्स हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. हा कोर्स 6 महिने ते 2 वर्षांचा असतो. या कोर्सनंतर तुम्हाला कंटेंट रायटिंग, एसइओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, लीड जनरेशन, ॲनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट यासारख्या नोकऱ्या सहज मिळतील. याशिवाय तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता.

3/11

डिप्लोमा इन टॅली ईआरपी

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

जर तुम्हाला अकाऊंट्स आवडत असेल तर तुम्ही डिप्लोमा इन टॅली ईआरपी कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमात टॅली शिकवली जाते. यानंतर तुम्ही अकाऊंट क्षेत्रातील नोकरीसाठी सहज अर्ज करू शकता.

4/11

डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

  डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप सेट करू शकता. याद्वारे तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील.

5/11

कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बी.कॉम

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

  हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स आहे. ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकवले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला फायनान्स, बिझनेस अकाउंट्स या विषयांबद्दल शिकवले जाते. यानंतर तुम्हाला फायनान्स कंपनीत सहज नोकरी मिळेल.

6/11

डिप्लोमा इन ई-कॉमर्स

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

  हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंगबद्दल शिकवले जाते. या कोर्सनंतर तुम्हाला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळेल.

7/11

बँकिंगमध्ये डिप्लोमा

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

  या कोर्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित विषय शिकवले जातात. तुम्हाला फायनान्स आवडत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग असे अनेक कोर्सेस आहेत. यामध्ये तुम्हाला बँकिंग कायद्याशी संबंधित विषय शिकवले जातील.

8/11

डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट कोर्स

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

या कोर्समध्ये तुम्हाला ब्रँड, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे मार्ग शिकवले जातात. कोर्स केल्यानंतर तुम्हाला दरमहा 50  हजार ते लाखापर्यंत पगार दिला जाईल.

9/11

इंजिनीअरिंग

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

बारावीनंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर इंजिनीअरिंग बेस्ट पर्याय आहे. इंजिनीअर हे प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात. तुम्ही कोणत्याही कंपनीतील उत्पादने आणि उपयुक्तता पाहिलात तर तुम्हाला इंजिनीअरिंगचे महत्व पटेल. इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅक्स, कॉम्प्युटर, वायफाय - सर्वत्र इंजिनीअर्सची गरज भासते. 

10/11

पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी जाऊ शकता. यासाठी पात्रता निकष म्हणून तुम्हाला बॅचलर डिग्रीची आवश्यकता नाही. 12वी सायन्समधून उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या सर्वात जास्त पगार देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.

11/11

एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम

HSC Result High Salary Top 10 Course After 12th Career Details

जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या जागरुकतेसह, पर्यावरण विज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. बारावीनंतर तुम्ही एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम केला तर तुम्हाला विविध दृष्टीकोन, अत्याधुनिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याची संधी मिळू शकते.