Ind vs Eng 5th T20: इंग्लंडला दणका, हे खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हिरो

भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 3-2ने विजय मिळवला आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. टीम इंडियानं शेवटच्या सामन्यात केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. विराट कोहलीच्या एका निर्णयानं बाजी पलटली आणि भारतीय संघाचा विजय झाला. 

Mar 21, 2021, 09:28 AM IST
1/6

विराट कोहली

विराट कोहली

कर्णधार विराट कोहलीनं रोहित शर्मासोबत ओपिनिंगला मैदानात उतरत धुरळा उडवला. धीम्या गतीनं सुरुवात करून तब्बल 80 धावांचा पल्ला गाठला. 

2/6

रोहित शर्मा

रोहित शर्मा

हिटमॅन रोहित शर्मानं देखील विराट कोहलीच्या मदतीनं दमदार कामगिरी केली. जवळपास 64 धावा खेळण्यात यश आलं. यावेळी त्याने 5 षटकार लगावले. 

3/6

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव फार काळ क्रिझवर टीकू शकला नसला तरी त्याने कमी बॉलमध्ये वेगानं धावा मिळवून दिल्या. 32 धावा काढून सूर्यकुमार बाद झाला. 

4/6

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकूरनं पुन्हा एकदा दिमाखदार कामगिरी दाखवली. पाचव्या सामन्यात त्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा हा गोलंदाज ठरला आहे. 

5/6

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं 39 धावांचा पल्ला गाठला. 20 ओव्हर पूर्ण झाल्यानं त्याने 39 धावांची नाबाद खेळी केली. 

6/6

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

या सामन्यात भारताचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याच्या चार षटकांत केवळ 15 धावा देऊन 2 गडी बाद केले. फलंदाजीच्या खेळपट्टीवर भुवीने इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणलं.