पावर प्लेमध्ये भारतीय संघाला मोठं अपयश, 5 कारणांमुळे गमावला तिसरा टी 20 सामना

अहमदाबाद इथे 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून तिसऱ्या टी 20 सामन्यात कोणत्या 5 चुका झाल्या ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला जाणून घेऊया.

Mar 17, 2021, 08:58 AM IST
1/5

के एल राहुलची यापूर्वी दोन्ही सामन्यांमध्ये कामगिरी विशेष नव्हती. तरी देखील पुन्हा एकदा त्याला संधी देण्यात आली. तर सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेवनमधून बाहेर करण्यात आलं. तर रोहित शर्मा आणि केल एल राहुल ओपनिंगसाठी उतरले. त्यामुळे ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तर विराट कोहली स्वत: चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरला. सुरुवातीच्या फळीतील नियोजन बिघडल्यानं त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला

2/5

सुरुवातीच्या फळीत भारतीय संघाला मोठं अपयश आलं. पहिल्या 10 ओवरमध्ये भारतीय संघातील खेळाडू अगदी धीम्या गतीनं खेळत होते. के एल राहुल शून्यवर आऊट झाला. रोहित शर्माला केवळ 15 धावा काढण्याच यश आलं. तर ईशान किशननं केवळ 4 धावा केल्या.

3/5

विराट कोहलीची एक चूक ऋभष पंतला चांगलीच महागात पडली आहे. विराट कोहलीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ऋषभ पंत रन आऊट झाला. जबरदस्त फॉर्ममध्ये सुरू असलेला ऋषभचा खेळ एका क्षणात थांबला त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. 

4/5

गोलंदाजीचा विचार करताना युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर खूपच महागडे ठरले. चहलने 4 षटकांत 10.25 च्या सरासरीने 41 धावा केल्या तर ठाकूरने 3.2 षटकांत 10.80 च्या सरासरीने 36 धावा केल्या.

5/5

इंग्लंड विरुद्ध सामना सुरू असताना भारतीय संघाची फिल्डिंग अत्यंत वाईट होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला जास्त धावा करण्यात यश आलं आहे. विराट कोहली आणि युजवेंद्र चहलने कॅच सोडला तर भारतीय फिल्डर्सनी रन आऊटची मिळालेली संधी देखील गमावली.