पुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी; फिरायला जायचंय? पाहा एकाहून एक कमाल ठिकाणांची यादी

Independence Day 2023 : ऑगस्ट महिन्यात ही संधी तुम्हाला मिळतेय. कारण नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यदिनाचा आठवडा आणि आजुबाजूला असणाऱ्या सुट्ट्या तुम्हाला भटकंतीसाठी खुणावतोय.   

Aug 08, 2023, 09:12 AM IST

Independence Day 2023 : सुट्टीच्या निमित्तानं घरात बसून राहणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. किंबहुना तुम्हीही यापैकीच एक असाल. धकाधकीच्या जीवनात जिथं आपण दिवसाचा अधिकाधिक वेळ कामात घालवतो तिथं एखादी सुट्टी मिळाताच तिचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आपण पुढे सरसावतो. 

 

1/7

कधी आहे ही मोठी सुट्टी?

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

आता तुम्ही म्हणाल कधीय ही मोठी सुट्टी? तर 12 ऑगस्टपासूनच (शनिवार) हा सुट्ट्यांचा सिलसिला सुरु होतोय. त्यानंतर 13 ऑगस्टला रविवार. एक सोमवार सोडला तर, मंगळवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि बुधवारी 16 ऑगस्टला  पारसी नववर्ष अशा सुट्ट्या लागून आल्या आहेत. जिथं तुम्हाला एखादी जास्तीची सुट्टी घ्यावी लागेल. राहिला मुद्दा जायचं कुठं? तर ही घ्या यादी...   

2/7

चिकमंगळूर

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

कर्नाटकातील चिकमंगळूर हे गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी चर्चेत आलेलं ठिकाण. इथं तुम्हाला अनेक अॅक्टिव्हीटीजचा आनंद घेता येईल. सोबतीला असेल इथला निसर्ग...   

3/7

शिलाँग

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

मेघालयची राजधानी असणारं शिलाँगसुद्धा या यादीत आहे. इथं येण्यासाठी तुम्हाला सुट्टी काहीशी वाढवाली लागू शकते. शिलाँगमध्ये येताच इथं असणारे तलाव आणि धबधबे तुमच्या मनाचा ठाव घेतील.   

4/7

जोधपूर

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

राजेशाही थाट असणाऱ्या राजस्थानातील जोधपूर अर्थात Blue City मध्ये येताच तुम्हाला आपण एका Royal ठिकाणी आल्याचा अंदाज येईल. जोधपूरमधील चवीष्ट खाद्यपदार्थांसोबत तुमच्या प्रवासाचा अनुभव वाढवतील, मेहरान गढ, मंडोर, जसवंत थाडा आणि अशी अनेक ठिकाणं. इथं तुम्हाला जुन्हा महालांमध्येही राहण्याची संधी मिळेल.   

5/7

कूर्ग

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

बंगळुरूपासून 7 तासांच्या अंतरावर असणारं कूर्ग हे ठिकाण भारताचं स्कॉटलंड म्हणूनही ओळखलं जातं. शहरी धकाधकीपासून दूर कूर्गमधील निसर्ग तुमच्या मनात कायमचं स्थान मिळवून जाईल.   

6/7

तापोळा

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

हे ठिकाण मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकरांसाठी सहज पोहोचता येईल असं. महाबळेश्वर पट्ट्यामध्ये येणारं तापोळा हेसुद्धा त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. इथं कुटुंबासमवेत येऊन तुम्ही काही निवांत क्षण अनुभवू शकता. ट्रेकिंग, हायकिंग, बोटींगचा आनंद तुम्हाला इथं घेता येईल.   

7/7

अॅलेप्पी

Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi

केरळातील बॅकवॉटर्सचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या सुट्टीसाठी अॅलेप्पीला भेट देऊ शकता. बंगळुरूपासून हे ठिकाण 13 तासांच्या अंतरावर आहे. इथं येताच तुम्ही कुट्टनाड बॅकवॉटर्स, अलापुझा बीच, मारारी बीचवर फेरफटका मारु शकता. शिवाय पोट भरण्यासाठी मस्त्याहारावर आणि केरळी शैलीच्या शाकाराहीवर तावही मारु शकता.