WI vs IND: टीम इंडियाच्या खेळाडूंची 'फुल ऑन मस्ती', जड्डू म्हणतो 'खींच मेरी फोटो...'

Team india in West Indies: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Jul 18, 2023, 11:03 AM IST

Team india in West Indies: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

1/5

दुसरा कसोटी सामना

आता वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे 20 जुलैपासून सुरू होईल. त्याआधी खेळाडूंनी डॉमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर धमाल केली.

2/5

फोटो समोर

यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, केएस भरत, रवींद्र जडेजा,  नवदीप सैनी या खेळाडूंचे फोटो समोर आले आहेत.

3/5

डॉमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर मस्ती

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा डॉमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसला. 

4/5

जडेजाचा स्वॉग

रवींद्र जडेजाने बोट राईड करत फोटोशूट केलं. काळी टोपी अन् पांढरा टीशर्ट असा पेहराव जड्डूने केलाय. त्यामध्ये जडेजा स्वॉग दाखवताना दिसतोय.

5/5

आर आश्विन आणि शार्दुल ठाकूर

काही दिवसांपूर्वी जडेजा, आर आश्विन आणि शार्दुल ठाकूर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.