PHOTO: SBI मध्ये 2.89 कोटी, 4 सोन्याच्या अंगठ्या आणि..; मोदींनी जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर जाहीर केली एकूण संपत्ती

PM Modi Property Details: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जाबरोबर मोदींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीसंदर्भातील तपशील जाहीर केला आहे. मोदींकडे किती कॅश, सोनं, गाड्या, घर, जमीन आहे जाणून घेऊयात...

| May 15, 2024, 11:52 AM IST
1/12

PM Modi Property Details

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती आहे यासंदर्भातील माहिती त्यांनी मंगळवारी, 14 मे रोजी वाराणसीमधून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरच्या प्रतिज्ञापत्रामधून समोर आली आहे. मोदींनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक नेते होते.  

2/12

PM Modi Property Details

मोदींची एकूण संपत्ती 3 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. मात्र पंतप्रधानांच्या नावावर कोणतीही जमीन, घर किंवा कार नाही. पंतप्रधानांनी मंगळवारी वाराणसीमधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.   

3/12

PM Modi Property Details

पंतप्रधानांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपली एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख रुपये असल्याचं नमूद केलं आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून आपल्याकडे 3.02 कोटींची संपत्ती आहे असं मोदींनी म्हटलं आहे.  

4/12

PM Modi Property Details

मोदींकडील 3 कोटी 2 लाखांच्या संपत्तीमध्ये भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयच्या खात्यात 2 कोटी 89 लाख 45 हजार 598 रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. 

5/12

PM Modi Property Details

तसेच मोदींनी आपल्याकडे 52 हजार 920 रुपये कॅश असल्याचं सांगितलं असून गांधीनगर आणि वाराणसीमधील त्यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 80 हजार 304 रुपये आहेत.   

6/12

PM Modi Property Details

मोदींकडे असलेल्या संपत्तीमध्ये 45 ग्राम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्याही आहेत. या सोन्याच्या अंगठ्यांची किंमत 2 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. मोदींकडे 9 लाख 12 हजार रुपये हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून आहेत.  

7/12

PM Modi Property Details

मागील आर्थिक वर्षात मोदींनी 3 लाख 33 हजार रुपये आयकर भरला आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचं म्हटलं असून स्थावर मालमत्तेच्या मूल्यासमोर शून्य असं नमूद करण्यात आलं आहे. जमीन, घर किंवा एका ठिकाणाहून न हलवता येणारी संपत्ती यामध्ये जाहीर करावी लागते. मोदींकडे अशी कोणतीही संपत्ती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

8/12

PM Modi Property Details

प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये त्यांना दोषीही ठरवण्यात आलेलं नाही. ते सरकारला कोणत्याही पद्धतीचं देणं लागत नाहीत.   

9/12

PM Modi Property Details

प्रतिज्ञापत्रामध्ये पंतप्रधान मोदी हे अहमदाबादचे रहिवाशी आहेत. तसेच राजकारण हाच आपला व्यवसाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   

10/12

PM Modi Property Details

शपथपत्रामधील माहितीनुसार, मोदींनी सन 1967 मध्ये एसएससीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच 1983 साली त्यांनी गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली.  

11/12

PM Modi Property Details

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक जमीनीचा तुकडा, 1.27 कोटी रुपयांचे बचत खाते आणि 38 हजार 750 रुपये रोख रक्कम अशी एकूण 2.50 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.  

12/12

PM Modi Property Details

तर मोदींनी 2014 मध्ये एकूण संपत्ती 1.65 कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान मोदींची एक वेबसाईट असून फेसबुक, एक्स, युट्यूब, इंन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर ते सक्रीय असल्याचं सांगण्यात आलं आहे.