Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये? 

Apr 08, 2024, 15:33 PM IST

Indian Railway : जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असणाऱ्या भारतीय रेल्वेच्या कक्षा आता लक्षणीयरित्या रुंदावल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या रेल्वेनं अगदी सहज पोहोचता येतं. 

 

1/7

तिकीट कन्फर्म होणार की नाही?

Indian Railways auto ticket upgradation process latest news

Indian Railway : बुक केलेलं तिकीट कन्फर्म होणार की नाही, बरं झालं तर बोगी कोणती असेल असे एक ना अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात घर करतात. तुम्हाला एक गंमत माहितीये का, तुम्ही चक्क स्लीपर कोचचं तिकीट बुक करून एसी डब्यातूनही प्रवास करु शकता. 

2/7

आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही

Indian Railways auto ticket upgradation process latest news

आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही, कारण हे खरंय. रेल्वेची एक अशी योजना आहे जिथं तुम्हाला AC3 मध्ये प्रवास करण्याची संधी मिळते. भारतीय रेल्वे विभाग ही योजना ऑटो अप्रगेडेशन स्कीम या नावानं प्रवाशांच्या सेवेत आणते. 

3/7

नफा कमवण्य़ाच्याच हेतूनं योजना

Indian Railways auto ticket upgradation process latest news

रेल्वेच्या वतीनं नफा कमवण्य़ाच्याच हेतूनं ही योजना प्रवाशांपर्यंत आणण्यात आली आहे. रेल्वे संपूर्ण प्रवासी क्षमतेच्या आरक्षणांसह प्रवासाला निघावी हा यामागचा मुख्य हेतू. 

4/7

नुकसानाचा सामना

Indian Railways auto ticket upgradation process latest news

अनेकदा रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास आणि एसी सेकंड क्लासमधून काही सीट रिकाम्याच राहतात. या सीट रिकाम्या राहिल्यामुळं रेल्वेचच नुकसान होतं. याच नुकसानाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं एक शक्कल लढवली आहे.   

5/7

ऑटो अपग्रेड स्कीम

Indian Railways auto ticket upgradation process latest news

ऑटो अपग्रेड स्कीम हा त्याचाच एक भाग. इथं अपर क्लासमध्ये कोणतीही सीट रिकामी राहिल्यास स्लीपर किंवा त्या अपर क्लासच्या खालील क्लासमधील तिकीटांना अपग्रेड करण्यात येतं. अर्थात वरील क्लासमध्ये ते तिकीट वैध ठरतं. 

6/7

तिकीट कन्फर्म करत असताना ...

Indian Railways auto ticket upgradation process latest news

तिकीट कन्फर्म करत असताना तुम्हाला ते ऑटो अपग्रेड करायचं आहे की नाही याबद्दलचा प्रश्न रेल्वे तुम्हाला विचारते. तुम्ही इथं 'हा' असा पर्याय निवडला तर, ते तिकीट अपग्रेड होतं. इथं तुम्ही कोणताही पर्याय निवडला नाही, तरीही ते तिकीट अपग्रेड होतं. त्यामुळं पर्याय नक्की निवडा. 

7/7

लक्षात ठेवा

Indian Railways auto ticket upgradation process latest news

समजा रेल्वेच्या फर्स्ट एसीमध्ये 6 तिकीटं आहेत आणि त्यातील 3 सीट रिकाम्या आहेत तर, सेकंड एसीमधील काही प्रवाशांचं तिकीट इथं अपग्रेड होऊन त्यांना फर्स्ट एसीनं प्रवास करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळं इथून पुढं तिकीट काढताना हे ऑटो अपग्रेड प्रकरण लक्षात ठेवा बरं!