महाराष्ट्रातील अनोखा काळमांडवी धबधबा, वर्षभर कोसळतो, मुंबईच्या अगदी जवळ, फोटो पाहून तुम्हालाही जावंस वाटेल

पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात तसेच देशभरातून अनेक ठिकाणचे पर्यटक येतात. 

Mar 13, 2024, 21:25 PM IST

Kalmandavi Waterfall :  पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधबा आहे.  जव्हार शहरापासून अवघ्या 8 किमी अंतरावर हा धबधबा आहे. केळीचा पाडा या गावातून धबधब्याजवळ जाता येते. 

1/6

मुंबईच्या अगदी जवळ असलेला एक हिडन वॉटरफॉल अर्थात डोंगरकपारीत लपलेला धबधबा ट्रेकर्सना आकर्षित करत आहे. 

2/6

ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी अनेक पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देतात.   

3/6

जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे.  हा धबधबा 100 मी. खोल आहे. विशेष म्हणजे हा धबधबा वर्षभर कोसळतो. 

4/6

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा धबधबा  SUMMER WATERFALL म्हणून सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे.   

5/6

जवळपास सर्व धबधबे पावसाळा असेपर्यंतच प्रवाहित असतात. मात्र,  पावसाळा जाऊन हिवाळा संपून वसंत ऋतुची चाहुल लागली तरी हा धबधबा प्रवाहित आहे. 

6/6

हा धबधबा अतिशय सुंदर आहे. तितकाच हा धबधबा धोकादायक देखील आहे. कारण याचा डोह अतिशय खोल आहे.