Bigg Boss चे विजेते आज काय काम करतायंत ?

Jan 15, 2018, 16:50 PM IST
1/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 1`चा विजेता राहुल रॉय  सिनेक्षेत्रापासून दूर गेला आहे. रोहितच्या मते बिग बॉसच्या माध्यमातून मिळालेल्या ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा तो पुरेसा फायदा उचलू शकला नाही.  

2/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 2`चा विजेता आशुतोष कौशिक टीवी आणि सिनेमापासून दूर ग़ेला आहे. सध्या आशुतोष 5 ढाब्यांचा व्यवसाय सांभाळत आहे.   

3/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 3` चा विजेता विंदू दारा सिंह अनेक ठिकाणी काम करत आहे.  महाबळेश्वरमध्ये चिल्ड्रन कॅपिंग, मुंबईमध्ये ब्यूटी सलून आणि पंजाबी सिनेमांमध्ये काम करत आहे. 

4/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 4` ची विजेती श्वेता तिवारी ही हिंदी मालिकांंमधून रसिकांच्या भेटीला आली. `कसौटी जिंदगी की`मधून श्वेता तिवारी पुन्हा नावारूपास आली. त्यानंतर श्वेताने टीवी सीरियल `बेगुसराय` मध्ये काम केले. 

5/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 5` ची विजेती जूही परमार पौराणिक मालिका`शनि`मध्ये व्यस्त आहे. बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वी ती `कुमकुम`या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती.  

6/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 6`ची विजेती उर्वशी ढोलकिया हिंदी मालिका `चंद्रकांता` मध्ये राणी इरावतीची भूमिका साकारत आहे.   

7/10

Big Boss

Big Boss

`बिग बॉस 7`ची विजेती गौहर खान बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. `बेगम जान`, `बद्रीनाथ की दुल्हनिया`, `फीवर` चित्रपटामध्ये ती झळकली आहे. 

8/10

Big Boss

Big Boss

'बिग बॉस 8'चा विजेता गौतम गुलाटी अभिनय क्षेत्रात आहे. `अजहर`,`बहन होगी तेरी` या चित्रपटामध्ये तो झळकला आहे.   

9/10

Big Boss

Big Boss

बिग बॉस 9 चा विजेता प्रिंस नरूला  `बड़ो बहु` आणि `रोडीज` या कार्यक्रमामध्ये जज झाला आहे. यापूर्वी दोन गाणीदेखील प्रिंसने गायली आहेत. लवकरच तो पंजाबी चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

10/10

Big Boss

Big Boss

'बिग बॉस10'चा विजेता मनवीर गुर्जरला विजेतेपदानंतर अ‍ॅंकरिंगच्या अनेक ऑफर आल्या मात्र त्याला बॉलिवूडमध्ये करियर करायचं आहे.