Lakshmi Narayan Yog : सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग, 'या' राशी होणार धनलाभ?

Lakshmi Narayan Yog : बुध आणि शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 22, 2023, 08:54 AM IST

Lakshmi Narayan Yog : शारीरिक सुख, सौंदर्य आणि समृद्धीचा कारक जेव्हा आपलं स्थान बदलतो तेव्हा अनेक राशींवर त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. सध्या सिंह राशीत शुक्र आणि बुधाची युती झाली आहे. (lakshmi narayan yoga mercury venus conjunction in leo these zodiac signs get benefit)

1/8

लक्ष्मी नारायण राजयोग

ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानाच्या बदलाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांना भेटतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात.

2/8

शुक्र बुध युती

शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने सिंह राशीत अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण रायजोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना व्यवसायात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. 

3/8

सिंह (Leo)

सिंह राशीतच हा राजयोग तयार झाल्यामुळे या राशीला सर्वाधिक फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होणार आहे. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य मिळणार आहे.   

4/8

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरणार असून तुम्हाला अनेक लाभ मिळणार आहेत. या राजयोगाच्या शुभ प्रभावाने तुम्हाला मुलांचं सुख प्राप्त होणार आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे.

5/8

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग शुभ सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत.  

6/8

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांचे त्यांच्या आईशी चांगले संबंध निर्माण होणार आहे. आईकडून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.   

7/8

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने लक्ष्मी नारायण राजयोग शुभ असणार आहे. तुमच्या राशीनुसार हा योग चढत्या घरात निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

8/8

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना या शुभ योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार असून तुमचा सन्मान वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)