Cheapest Bikes: किंमत 60 हजारापेक्षा कमी, 80KM मायलेज; ही घ्या सर्वात स्वस्त बाईक्सची यादी

शहरापासून गावापर्यंत कम्यूटर सेगमेंटमधील 100 सीसी बाईक्सला प्राधान्य दिलं जातं. अशाच कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घ्या.   

Feb 23, 2024, 19:03 PM IST
1/7

रोजच्या वापरासाठी सर्वसामान्यांकडून आजही कम्युटर सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जाते.   

2/7

शहरापासून गावापर्यंत कम्यूटर सेगमेंटमधील 100 सीसी बाईक्सला प्राधान्य दिलं जातं. अशाच कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घ्या.   

3/7

या बाईक्सची किंमत 59 हजारांपासून सुरु होते. याशिवाय त्यांचा मायलेजही चांगला आहे.  

4/7

Bajaj CT110X

Bajaj CT110X  या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक कार्बोरेटरसह 115.45 सीसी क्षमतेच्या एअर-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. 127 किलोची ही बाईक 70 किमीपर्यंतचा मायलेज देते. या बाईकची किंमत 69 हजार 216 रुपये आहे.   

5/7

TVS Sport

TVS Sport  या बाईकमध्ये इको-थ्रस्ट फ्यूएल-इंजेक्शन 109.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आलं आहे. हिचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे. ही बाईक जवळपास 75 ते 80 किमीचा मायलेज देते. हिची किंमत 59 हजार 431 आहे.   

6/7

Hero HF 100

Hero HF 100 हिरो एचएफ 100 देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे. यामध्ये 97.2 सीसी इंजिनचा वापर करण्यात आला आहे. 109 किलोची ही बाईक सामान्यपणे 70 किमी/लीटरचा मायलेज देते. हिची किंमत 59 हजार रुपये आहे.   

7/7

बाईकची किंमत दिल्लीमधील एक्स-शोरुमच्या आधारे आहे. तसंच मायलेजही रिपोर्टच्या आधारे आहे. गाडी वापरताना त्यात वेगळे निकाल दिसू शकतात.