केवळ महाराष्ट्रच नव्हे, 'या' राज्यांसह विविध देशांमध्येही 'बोलतो मराठी!'

महाराष्ट्र ही कामगारांची, शूर वीरांची, कवी, लेखक, साहित्यकांची भूमी..मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. 

| Apr 26, 2024, 15:14 PM IST

 Maharashtra Din: महाराष्ट्र ही कामगारांची, शूर वीरांची, कवी, लेखक, साहित्यकांची भूमी..मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. 

1/10

महाराष्ट्राची मराठी साता समुद्रापार! 'या' राज्यांसह देशांमध्येही बोलतात मराठी

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

Maharashtra Din: 1 मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. महाराष्ट्र ही कामगारांची, शूर वीरांची, कवी, लेखक, साहित्यकांची भूमी..या भूमीला संघर्षाचा वारसा लाभलाय. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. 

2/10

राज्यांसह अनेक देशांमध्ये

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

कुसुमाग्रज, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, पुलं देशपांडे अशी अनेक मराठी नावे आपण कौतुकाने घेतो. दरम्यान मराठी ही केवळ महाराष्ट्रातच बोलली जाते असे नाही. तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये एवढेच नव्हे तर अनेक देशांमध्ये तुम्हाला मराठी बोलणारी माणसे सापडतील. 

3/10

दादरा आणि नगर हवेली

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे मराठी बोलले जाते. मराठी ही पश्चिम भारतातील या केंद्रशासित प्रदेशातील अधिकृत भाषांपैकी एक आहे. त्यामुळे येथे तुम्हाल मराठी भाषिक आढळतील.

4/10

गोवा

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

गोवा राज्यात नियमानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होताना दिसतो. मराठी ही गोवा राज्याच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. गोव्यातील लोकसंख्येचा मोठा भाग मराठी बोलतो आणि समजू शकतो.

5/10

कर्नाटक

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

कर्नाटक हे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले राज्य आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या सीमेवरील संस्कृती, भाषेत साधर्म्य आढळते. कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमधील नागरिक मराठी बोलतात.

6/10

मध्य प्रदेशमधील काही जिल्हे

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मराठी बोलली जाते.

7/10

तेलंगणा

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या काही जिल्ह्यांतील अल्प लोकसंख्या मराठी बोलते.

8/10

छत्तीसगड

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

छत्तीसगडच्या काही भागातील लोक तुम्हाला मराठी बोलताना दिसतील. विशेषतः महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या लोकांना मराठी कळते. बोलता येते.

9/10

आंध्र प्रदेश

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

आंध्र प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात मराठी बोलणारे, समजू शकणारे नागरिक आहेत.

10/10

मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल

Maharashtra Din Marathi is spoken in countries including states

राज्यांसोबतच अनेक देशांमध्येही तुम्हाला मराठी भाषिक आढळतील. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, कॅनडा ब्रिटन आणि न्यूझीलंड या देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. येथे तुम्हाला मराठी भाषिक सापडतील.