इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या. 

Feb 16, 2024, 14:44 PM IST

Forts in Maharashtra : महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली इतिहासामध्ये गडकिल्ल्यांना विसरुन चालणार नाही. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जाण्यापासून याच स्वराज्याची तोरणमाळ आणि राजांचा अभिषेक या सर्व गोष्टी राज्यातील गडकिल्ल्यांनी अनुभवल्या आहेत. 

1/8

मुरुड जंजिरा

Maharashtra news most stunning forts and their importance

जाणून आश्चर्य वाटेल पण, हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी आहे. या सागरी किल्ल्यावर काही पळवाटा, एक मशीद आणि एक टाकं आहे.   

2/8

दौलताबाद

Maharashtra news most stunning forts and their importance

दौलताबादचा किल्ला त्याच्या रचनेसाठी ओळखला जातो. शत्रूला गडावर चाल करताच येऊ नये अशी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या किल्ल्यावर येण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात.   

3/8

विजयदुर्ग

Maharashtra news most stunning forts and their importance

हा सिंधुदुर्गातील एक सर्वात जुना किल्ला असून, कोकण किनारपट्टीवरील हा एक अद्भूत किल्ला ठरतो. राजा भोज दुसरा यांच्या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती करण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. मराठा साम्राज्यातील जहाजांचं तळ इथंच ठोकलेलं होतं असं म्हटलं जातं.   

4/8

पुरंदर

Maharashtra news most stunning forts and their importance

असं म्हणतात की, पुण्याताली पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचा म्हणजेच छत्रपची संभाजीराजेंचा जन्म झाला होता. या गडाला बालेकिल्ला आणि दिल्ली दरवाजा असे दोन भाग आहेत.   

5/8

मल्हारगड

Maharashtra news most stunning forts and their importance

पुण्यापासून 30 किमी अंतरावर असणाऱ्या मल्हारगडाचं नाव हिंदू देवदेवतांवरून ठेवण्यात आलं आहे. या गडावर पोहोचण्यासाठी सोनोरी गावातून जाणारी वाट धरावी लागते. या गडाच्या तटबंदी आणि बाह्यभाग शाबूत असला तरीही अंतर्भागाचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.   

6/8

प्रतापगड

Maharashtra news most stunning forts and their importance

स्वराज्यातील आणखी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड. तुम्हाला माहितीये का, हा गड दोन किल्ल्यांपासून तयार झाला आहे. ज्याचा एक भाग गडाचा माथा असून, दुसरा भाग दक्षिण पूर्वेकडे आहे.   

7/8

तुंग

Maharashtra news most stunning forts and their importance

पुण्यापासून काही अंतरावरच तुंग किल्ला आदिल शाहनं साधारण इसवी सन 1600 मध्ये बांधला होता. टोकदार सुळका आणि काहीसा अंडाकृती आकाराचा हा तुंग किल्ला अनेक ट्रेकर्सच्या आवडीचा.   

8/8

राजगड

Maharashtra news most stunning forts and their importance

राजगड, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुरुंबादेवी डोंगरावर हा गड उभा आहे. ही स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी, सई राणीसाहेब यांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस इथं व्यतीत केले होते.