महाराष्ट्रतील सर्वात अनोखा विवाह सोहळा! पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह संपन्न

या अनोख्या विवाह सोहळ्यात विधीवत मंत्रपठण करत अक्षता आणि फुलांची उधळण करण्यात आली.

| Apr 10, 2024, 21:37 PM IST

Shrimant Dagdusheth Ganpati : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा पार पडला. भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम होय, त्यामुळे हा सोहळा बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

1/7

 श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा पाहण्यासाठी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.    

2/7

 ब्रह्मवृंदांनी यावेळी मंत्रपठण केले. शुभमंगल सावधानच्या सुराने संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले. 

3/7

 श्री गणेश आणि देवी वल्लभा यांच्या मूर्ती वधू आणि वराप्रमाणे सजवण्यात आल्या होत्या. 

4/7

श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा अनुभविण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.  

5/7

 भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम.

6/7

अक्षता व फुलांची उधळण आणि मोरया, मोरया च्या जयघोषात चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी १२ वाजता श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा  पार पडला.  

7/7

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.