मंदिरा बेदीने मुलासोबतचे हॉलिडे PHOTOS इंस्टाग्रावर केले शेअर, ट्रोलर्सने म्हटलं...

Mar 29, 2018, 20:05 PM IST
1/7

अभिनेत्री मंदिरा बेदी आपला मुलगा वीर याच्यासोबत गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत आहे. सुट्टीची मजा लुटणाऱ्या मंदिराने आपल्या हॉलिडेजचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, ट्रोलर्सला मंदिराचा हा अंदाज आवडलेला दिसत नाहीये. मुलासोबत मस्ती आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करणाऱ्या मंदिराच्या फोटोजवर ट्रोलर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत.

2/7

४५ वर्षीय मंदिरा बेदीला फिटनेसची खूपच आवड आहे. फिटनेस दरम्यानचे व्हिडिओज आणि फोटोज संदर्भात मंदिरा नेहमीच चर्चेत राहते.

3/7

मंदिरा सध्या आपल्या परिवारासोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. मंदिराने पोस्ट केलेल्या फोटोजवर अनेकांनी तिला सल्ला दिला आहे तर काहींनी कौतुकही केलं आहे.

4/7

एमटीव्हीच्या ट्रोल पुलीस या कार्यक्रमात मंदिराने नुकतचं ट्रोलर्सवर भाष्य केलं होतं. "मी अशा गोष्टींवर लक्ष देत नाही कारण माझ्याकडे नारी शक्ती आहे." नारी शक्तीला मंदिरा प्रेरणा मानते.

5/7

शो दरम्यान मंदिराने आपल्या ट्रोलर्सला चांगलचं सुनावलं होतं. हा शो झरीन होस्ट करते आणि झरीननेही मंदिराला खूपच सपोर्ट केला होता.

6/7

मंदिरा बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ग्लॅमर आणि फॅशन आयकॉन असलेल्या मंदिराने क्रिकेट शोचंही अँकरींग केलं आणि हे प्रचंड गाजलं.

7/7

सोशल मीडियात मंदिरा खूपच अॅक्टिव्ह असते आणि नेहमी आपले फोटोज सोशळ मीडियात शेअर करत असते. (फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)