मनिषा कोईराला - शेखर सुमन यांच्यातील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'तो सीन स्क्रिप्टमध्ये...'

Shekhar Suman Manisha Koirala Intimate Scene in Heeramandi : 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमुळे यातील कलाकार सध्या खूप चर्चेत आहेत. यातील मनिषा कोईराला - शेखर सुमन यांच्यातील इंटिमेट सीन अभिनेत्रीने धक्कादाय खुलासा केलाय. 

May 07, 2024, 16:36 PM IST
1/7

सोशल मीडियावर संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेब सिरीज तुफान गाजतेय. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे. 

2/7

या सिरीजमधील मल्लिका जानची भूमिका साकारणारी मनिषा कोईरालाच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक होतंय. 

3/7

या सिरीजमधील मनिषा आणि शेखर सुमन यांच्यामधील इंटीमेट सीनबद्दल खुद्द अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केलाय. 

4/7

बग्गीतील शेखर आणि मनिषामधील शारीरिक संबंधाबद्दलचं भाष्य सुरु असताना जो मल्लिकाजानशी काल्पनिक रुपात इंटीमेट सीन देतो. शेखरच्या या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात येत आहे. 

5/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या सीनची एवढी चर्चा होते तो सुरुवातीला  स्क्रिप्टचा भाग नव्हता, असं मनिषा कोईराला हिने स्वत: सांगितलंय.

6/7

मनिषा पुढे असंही म्हणाली की, संजय लीला भन्साळी यांना नेहमीच काहीतरी हटके आणि नवीन करायचं असतं. जेव्हा या सीनचं रिहर्सल सुरु होती तेव्हाच हा वेबस्टोरीचा भाग झाला. 

7/7

मीडिया रिपोर्टनुसार शेखर सुमन या सीनबद्दल म्हणाला की त्यांनी एका टेकमध्ये अप्रतिम अभिनयाने तो पूर्ण केला.