'मी दर निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना...', चिन्मय मांडलेकरने मांडली राजकीय भूमिका

माझ्यासाठी माझी राजकीय भूमिका हिच..., चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला

| Apr 14, 2024, 23:14 PM IST

मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यापासून ते ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मल्लिक बिट्टा या खलनायकाची भूमिका साकारण्यापर्यंत चिन्मयने आपल्या अभिनयाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

1/10

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखले जाते. त्याने नाटक, मालिका, चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

2/10

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्याने त्याची वेगळी भूमिका साकारली आहे. मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यापासून ते ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मल्लिक बिट्टा या खलनायकाची भूमिका साकारण्यापर्यंत चिन्मयने आपल्या अभिनयाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

3/10

मतदान आणि निवडणुकीबद्दल व्यक्त केलं मत

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

चिन्मय मांडलेकरने आता मतदान आणि निवडणूक याबद्दल रोखठोक मत व्यक्त केलं आहे. अजब गजब या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने निवडणुकांबद्दल भाष्य केले.

4/10

दर निवडणुकीत न चुकता मतदान करतो

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

माझ्यासाठी आपण निवडणुकीत जे मत देतो ते महत्त्वाचं आहे. मी दर निवडणुकीत न चुकता, व्यवस्थित विचार करुन मतदान करतो, असे चिन्मय मांडलेकर म्हणाला.

5/10

सर्व निवडणुकीत मतदान

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

मी खूप अभिमानाने सांगू शकतो की मी 18 वर्षांचा झाल्यापासून आतापर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकीत मी मतदान केलं आहे, असेही चिन्मय मांडलेकरने सांगितले.

6/10

माझी राजकीय भूमिका हिच

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

त्यापुढे तो म्हणाला, मी आतापर्यंत दर निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मत दिलं आहे. माझ्यासाठी माझी राजकीय भूमिका हिच आहे. जो काम करेल त्याला मत द्या.

7/10

प्रामाणिक मतदारांबद्दल वक्तव्य

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

जे प्रामाणिक मतदार आहेत, ते लोकशाहीची ठासतात. जे व्यक्ती काहीही झालं तरी माझ मत याच पक्षाला याच व्यक्तीला. हे परंपरागत, प्रामाणिक मतदार असतात, असेही त्याने सांगितले.

8/10

जर काम केलं असेल तरच मतदान

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

मी परंपरागत मतदार नाही. माझं बाप दाखवं नाहीतर श्राद्ध घाल, हे ठरलंलं आहे. जर काम केलं असेल, मला असं वाटलं की हा खरंच चांगला उमेदवार आहे. बऱ्याचदा तुम्हाला राजकीय पक्षाची भूमिका पटत नाही. पण त्यांनी तुमच्या भागात उमेदवार चांगला दिलेला असतो. हा सर्व विचार करुन मी दरवेळी मत देतो, असेही तो म्हणाला.

9/10

NOTA लाही मतदान नाही

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

त्यामुळे मी आतापर्यंत कोणत्याही पक्षाला सलग मत दिलेले नाही. मला जर वाटलं की हे नालायक आहेत. तर मी दुसऱ्यांना मत देतो. पण मी आजपर्यंत NOTA लाही मतदान केलेले नाही, असेही चिन्मयने सांगितले.

10/10

एका मताची किंमत जास्त

Marathi Actor Chinmay Mandlekar Talk About Political Role Said I voted different political parties in every election

मी कोणालाही न चुकताही मत देतो. माझं लक्ष असतं. एका मताची जी काही किंमत असेल, तरी माझ्यासाठी ती खूप जास्त आहे, असेही तो म्हणाला.