'वैयक्तिक कारणांमुळे मालिकेसाठी नकार दिला अन्...', मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

दोन मालिकांनंतर ती पुन्हा छोट्या पडद्यावर झळकलीच नाही, आता तिने याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Apr 07, 2024, 21:37 PM IST

दोन मालिकांनंतर ती पुन्हा छोट्या पडद्यावर झळकलीच नाही, आता तिने याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

1/8

सर्वच क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडेने नाटक, मालिका आणि चित्रपट सर्वच क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौरीने फ्रेंडस या चित्रटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.  

2/8

'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

गौरी ही 'कान्हा', 'फॅमिली कट्टा' या चित्रपटात झळकली. यानंतर गौरीने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. गौरीने 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केले. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. 

3/8

गौरीच्या मालिकांचे सर्वत्र कौतुक

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

त्यानंतर ती ‘सूर राहू दे’ या मालिकेत झळकली. गौरीच्या मालिकांचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाले. पण दोन मालिकांनंतर गौरी ही छोट्या पडद्यावर झळकलीच नाही. आता गौरीने याबद्दलचे कारण सांगितले आहे. 

4/8

छोट्या पडद्यावर न झळकण्यामागचे कारण सांगितले

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

गौरीने नुकतंच 'महाराष्ट्र टाईम्स' या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत गौरीला तू मालिकेत काम करणं का थांबवलंस असा प्रश्न विचारण्यात आला. 

5/8

वैयक्तिक कारणांमुळे नकार दिला

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

त्यावर गौरीने मनमोकळेपणाने उत्तर दिले. यात गौरी म्हणाली, "काही काळापूर्वी मला मालिकेत काम करण्यासाठी विचारणा झाली होती; पण माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी नकार दिला होता." 

6/8

छोट्या पडद्यावर नितांत प्रेम

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

'पण त्यानंतर मला मालिकांसाठी कमी प्रमाणात विचारणा होऊ लागली. माझं छोट्या पडद्यावर नितांत प्रेम आहे. कारण मालिकेमुळेच मला ओळख मिळाली', असे गौरी नलावडेने म्हटले.  

7/8

मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

'मला मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल. छोट्या पडद्यावर मला एखाद्या शोचं सूत्रसंचालन करायला किंवा परीक्षण करायला आवडेल', अशी इच्छाही गौरीने व्यक्त केली.   

8/8

तर मी त्यात नक्कीच काम करेन

Marathi Actress Gauri Nalawade Talk about why she not working in a serial

'तसेच जर चांगली संहिता, भूमिका आणि मर्यादित भाग असलेली मालिका मला ऑफर झाली तर मी त्यात नक्कीच काम करेन', असे गौरीने यावेळी म्हटले.