सौंदर्य वाढवण्याबरोबरच मेहंदीचे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीये का?

लग्नकार्यात किंवा सणावाराला भारतातीय स्त्रिया या हातावर मेहंदी काढतात.दागिने ,साड्या मेकअप या प्रमाणे मेहंदी हा प्रत्येक स्त्री चा हळका कप्पा आहे. 

May 18, 2024, 15:52 PM IST
1/7

मेहंदीमुळे  जसं तुमचं सौंदर्य वाढतं त्याचप्रमाणे त्याचे आयुर्वेदात काही चमत्कारीक फायदे सांगितले आहेत. 

2/7

शरीरातील उष्णता कमी करण्यास फायदेशीर

मेहंदीच्या पानांचा गुणधर्म हा थंडावा देणारा असतो. मेहंदी शरीरातील उष्णता खेचून घेते. 

3/7

 जर तुम्हाला उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास वारंवार जाणवत असल्यास हातावर मेहंदी लावल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. 

4/7

अंगदुखीवर रामबाण उपाय

शरीराला थंडावा देण्याबरोबर हातापायाला मेहंदी लावण्याने अंगदुखी कमी होण्यास मदत होते.

5/7

शरीराला थंडावा देण्याबरोबर हातापायाला मेहंदी लावण्याने अंगदुखी कमी होण्यास मदत होते. जर सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर डोक्याला मेहंदी लावल्याने शरीरातील वाढलेलं तापमान कमी होण्यास मदत होते.   

6/7

इंफेक्शन दूर होते

मेहंदीची पानं वाटून त्यात निलगीरी आणि कापूर टाकल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारचं  इंफेक्शन होत नाही. निलगीरी आणि कापूर जंतूनाशक असल्याने त्वचेवर कोणतीही अ‍ॅलर्जी होत नाही.  

7/7

दुर्गंधी दूर होते

बऱ्याच जणांना ऊन्हाळ्यात पायांना खूप घाम येतो, मेहंदी पायाला लावल्याने पायाची दुर्गंधी दूर होते.