एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023: मे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात लोकप्रिय असा 'मेट गाला' हा सोहळा संपन्न होतो. यावर्षी हा सोहळा काल म्हणजे 1 मे 2023 (Met Gala 2023) रोजी दिमाखात पार पडला. या वेळी या गालाची थीम होती, कार्ल लेगरफेल्ड : अ लाईन ऑफ ब्यूटी (Karl Lagerfeld: A Line of Beauty). कार्ल लेगरफेल्ड (Karl Lagerfeld) हे जगप्रसिद्ध जर्मन फॅशन डिझायनर होते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीनं त्यांनी जगाला एका वेगळ्या फॅशनची तोंडओळख करून दिली होती. या 'मेट गाला'ला त्यांचा सन्मान (Met Gala Celebrates Karl Lagerfeld) करण्यात आला.  

| May 02, 2023, 12:20 PM IST

Met Gala 2023 Alia Bhatt and Isha Ambani Look: जगातील सर्वात लोकप्रिय असा 'मेट गाला' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यावर्षीचा 'मेट गाला' (Met Gala Looks) हा फारच हटके असणार आहे. त्यामुळे सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'मेट गाला'ला आलेल्या सेलिब्रेटींची आणि त्यांच्या लुक्सची. फॅशन हा या सोहळ्यातला सर्वात मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे या गालाला येणाऱ्या सेलिब्रेटींच्या लुक्सची जगभरात चर्चा होताना दिसते. या 'मेट गाला'ला भारतीय सेलिब्रेटीही आवर्जून उपस्थित (Indian Celebs in Met Gala 2023) राहतात. काल संपन्न झालेल्या 'मेट गाला'ला अभिनेत्री आलिया भट्ट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीनं हजेरी लावली होती. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लुक्सची सर्वत्र चर्चा झाली होती. 

1/5

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023

अभिनेत्री आलिया भट्ट आणि ईशा अंबानी यांनी आजच्या मेट गाला लुकमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांच्या लुकची बरीच चर्चा झाली.  (Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

2/5

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023 alia bhatt

प्राबल गुरंग (Prabal Gurung) या अमेरिकन फॅशन डिझायनरनं त्या दोघींचे लुक डिझाईन केले होते. आलिया भट्टनं इन्टाग्राम पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की या ड्रेससाठी 1 लाख मोती लावले आहेत.  (Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

3/5

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023 isha ambani

रंग आणि टेक्सचर - आलिया भट्टनं व्हाईट स्लिव्हलेस गाऊन परिधान केला होता ज्याला मोठी गाऊन रिंगही (Gown Incide Ring) आत होती. त्यासोबतच ईशानं ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती.  (Photo - @akashambani_fc & @aliabhatt/Instagram)

4/5

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023 alia bhatt look

एमब्रोयडरी - आलियाच्या ड्रेसला मोत्यांची एमब्रोयडरी होती तर ईशाच्या साडीला डायमंड्स लावले होते. त्यामुळे त्या दोघांचाही कलर पॅलेट आणि डिझायनर लुक खुलून दिसत होता.  (Photo - @priyankarkapadia & @aliabhatt/Instagram)

5/5

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023 isha ambani look

या दोघींच्या एक्सेसरीजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. ईशानं हातात वेलवेटची पोटली घेतली होती तर आलियानं मोत्याचे कानातले आणि हातात तळहातांचे ब्रेसलेट घातले होते.    (Photo - @priyankarkapadia & @aliabhatt/Instagram)