Mhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची

Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे. 

Feb 28, 2024, 10:20 AM IST

Mhada News : म्हाडाची घरं... मुळात हक्काचं घर घेण्याची अनेकांचीच प्रक्रिया इथून सुरु होते. अर्थात म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होण्यापासून सुरु होते. 

1/7

अर्जनोंदणीची सुरुवात

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

Mhada News : आता याच म्हाडाच्या वतीनं विभागीय घटक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण, क्षेत्रविकास  मंडळाअंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये तब्बल 941 घरं आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीसाठीच्या अर्जनोंदणीची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज (28 फेब्रुवारी 2024) रोजी होणार आहे. 

2/7

अॅप

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

integrated housing lottery management system (IHLMS 2.0)  या नव्या पद्धतीनं आणि अॅपच्या सहाय्यानं या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात होईल. 

3/7

अर्ज भरण्याची प्रक्रिया

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

वरील पद्धतीच्या मदतीनं इच्छुक/ अर्जदार घरबसल्या या प्रक्रियेचा भाग होऊ शकतात. इथं अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं, नोंदणी करणं, ऑनलाईन पैसे भरणं अशा सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनंच पार पडणार आहेत. 

4/7

अधिकृत संकेतस्थळ

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

android फोनमध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) मध्ये अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येऊ शकतं. शिवाय म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे. 

5/7

सोडतीची तारीख

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

म्हाडाच्या या सोडतीसाठी तयार करण्यात आलेली लिंक 27 मार्च 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सुरु असेल. दरम्यानच्या काळात अनामत रक्कमही अर्जदार भरू शकणार आहेत.   

6/7

यादी

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

4 एप्रिल रोजी सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर करण्यात येईल. म्हाडाच्या संकेतस्थळावरही ही यादी जाहीर होणार आहे. 

7/7

कुठे उपलब्यध आहेत घरं?

Mumbai news mhada lottery for sale of 941 flats and 361 plots announced

राहिला मुद्दा या सदनिका आणि भूखंड कुठे उपलब्ध असतील तर, छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील.