नागा चैतन्यनं घेतली नवी-कोरी Porsche, लोक म्हणाले 'पुण्याला येऊ नकोस!'

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यनं नुकतीच पोर्शे कार खरेदी केली आहे. त्याच्या घरी त्या गाडीची डिलिव्हरी झाली आहे. इतकंच नाही तर नागा चैतन्यचे कारसोबतचे काही फोटो देखील समोर आले होते. चला जाणून घेऊया नागा चैतन्यच्या या पोर्शे कारविषयी काही खास गोष्टी...

| May 22, 2024, 15:06 PM IST
1/7

पोर्शे

नागा चैतन्यनं काही दिवसांपूर्वी पोर्शे 911 GT3 RS ही स्पोर्ट्स कार खरेदी केली. ती 911 बेस्ड एक रोड-बायस्ड ट्रॅक मशीन आहे. 

2/7

सगळ्यात मोठं विंग

911 GT3 RS ला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी अनेक अपग्रेड करण्यात आले आहेत. त्यासोबत एक मोठी विंग मिळते, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या Porsche 911 ला मिळणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठी मागची विंग आहे. जर्मन ऑटोमेकरनं नवीन साइड ब्लेड देखील जोडले आहेत. यात तीन ड्रायव्हिंग मोड आहेत: नॉर्मल, स्पोर्ट आणि ट्रॅक.

3/7

सिल्वर शेड

नागा चैतन्यच्या पोर्शे 911 GT3 RS कारला मेटेलिक सिल्वर शेड देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला एक नॉर्मल लूक देतो. 

4/7

इंजन पावर

पोर्शे 911 GT3 RS मध्ये 4.0-लिटर फ्लॅट-6 इंजिन 518bhp पॉवर आणि 465nm ची पीक टॉर्क जनरेट करते. ही कार  7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. कार 296 किमी. प्रतितास हाय स्पीडनं 3.2 सेकंदात 0-100 किमी. प्रति तास स्पीडनं धावू शकते. 

5/7

किती आहे किंमत?

या गाडीची किंमत ही 3.5 कोटी (एक्स शोरुम) पासून सुरु होते. दीड वर्षांआधीच नागा चैतन्यनं या गाडीची ऑर्डर दिली होती. 

6/7

नागा चैतन्यचं कार कलेक्शन

नागा चैतन्यकडे आणखी बऱ्याच कार आहेत. त्यात मित्सुबिशी लांसर आणि मारुति सुजुकी स्विफ्ट पासून निसान GT-R, फेरारी F430, मर्सिडीज-बेंज G-वॅगन सारख्या कार आहेत. पोर्शेशिवाय नागा चैतन्यकडे सध्या फेरारी 488 GTB, टोयोटा वेलफायर, लॅन्ड रोवर डिफेंडर V8 देखील आहेत. 

7/7

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

नागा चैतन्यच्या या फोटोवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी 'ही गाडी घेऊन पुण्याला येऊ नकोस', असं म्हटलं आहे.