अवकाशातून येताहेत भयंकर आवाज; ऐकून वाढेल धडधड

Space News : अशीच माहिती नुकतीच नासानं समोर आणली. जिथं अवकाशातील एक रहस्य जगासमोर आणलं आहे.

Nov 03, 2023, 12:43 PM IST

Space News : अवकाशातील प्रत्येक घटना असंख्य रहस्यांची उकल करून जाते. त्यातच जागतिक स्तरावर असणाऱ्या अनेक अंतराळ संशोधन संस्थाही त्यांच्या वतीनं अवकाश आणि त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक विषयांवर प्रकाश टाकला जातो. 

1/7

तुम्हीही हैराण व्हाल

nasa shares playlist of the sound of space will amazed you

Space News : नासाच्या माहितीनुसार अवकाशातून असे भयाण आवाज आतापर्यंत ऐकले गेले आहेत. की ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल, इतके की घरात एकटं राहण्याचीही भीतीच वाटेल. 

2/7

अवकाशातील आवाज

nasa shares playlist of the sound of space will amazed you

नासानं हल्लीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्लेलिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवकाशातील आवाज ऐकू शकता. 

3/7

भयपट पाहताना वाजणारं पार्श्वसंगीत

nasa shares playlist of the sound of space will amazed you

एखादा भयपट पाहताना वाजणारं पार्श्वसंगीत असतं असगदी तसे किंबहुना त्याहूनही भयाण आवाज अवकाशात होत असतात याचीच प्रचिती ही प्लेलिस्ट ऐकून लक्षात येतं. (आवाज ऐकण्यासाठी इथं क्लिक करा)  

4/7

ध्वनीलहरी

nasa shares playlist of the sound of space will amazed you

असं म्हणतात की अवकाशात मोठी पोकळी आहे. इथं अनेक भागांमध्ये विविध वायू आहेत. जिथं ध्वनीलहरी प्रवास करू शकतात. 

5/7

सोनिफिकेशन

nasa shares playlist of the sound of space will amazed you

नासाकडून सोनिफिकेशनला एका प्लेलिस्टमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. ही संपूर्ण यादी अंतराळ संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. 

6/7

बुध ग्रहापासून गुरु ग्रहापर्यंतचे आवाज

nasa shares playlist of the sound of space will amazed you

नासानं जारी केलेल्या या प्लेलिस्टमध्ये बुध ग्रहापासून गुरु ग्रहापर्यंतचे भयाण आवाज येत आहेत. 

7/7

ब्लॅक होलचा आवाज

nasa shares playlist of the sound of space will amazed you

तब्बल 250 मैल प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या ब्लॅक होलचा आवाजही इथं येत आहे. तुमच्यापासून दूर असणाऱ्या या विश्वास नेमकं काय सुरुये हे या आवाजांवरूनच कळतंय नाही का...