National No Smoking Day : मुलांच्या प्रेमाने या सुपरस्टार्सना पूर्णपणे बदलून टाकलं, सिगरेट-दारू देखील सोडली

अभिनेता शाहिद कपूरने नुकतंच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात त्याने स्मोकिंग सोडण्याचा निर्णय कसा घेतला? याबद्दल सांगितलं आहे. अनेक कलाकारांनी आपल्या मुलांसाठी चांगले बदल केले आहेत. 

| Mar 13, 2024, 15:03 PM IST

एकाचवेळी दोन सिगरेट पिणारा अभिनेता शाहीद कपूर 'कबीर सिंह' सिनेमामुळे चर्चेत आला. या सिनेमातील ऑनस्क्रीन स्मोकिंगमुळे समाजावर विपरित परिणाम झाला. मात्र मोठ्या पडद्यावर सिनेमेटिक लिबर्टी घेतली जाते. पण खऱ्या आयुष्यात मात्र या कलाकारांनी देखील आपल्या मुलांसाठी मोठे बदल स्वीकारले आहेत. 

तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातींवर अनेकवेळा स्टार्सना ट्रोल केले गेले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कोणतीही जाहिरात केली नाही परंतु वास्तविक जीवनात त्यांना सिगारेटचे व्यसन होते, ज्यांना आजच्या काळात चेन स्मोकर देखील म्हटले जाते. पण, या स्टार्सना नंतर कळले की ते तब्येतीसाठी चांगले नाही, त्यानंतर त्यांनी सिगारेट कायमची सोडून दिली.

1/7

रणबीर कपूर

National No Smoking Day

डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या ऍनिमल हा सिनेमा खूप चर्चेत राहिलं. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सुपरस्टार रणबीर कपूरने खऱ्या आयुष्यात सिगरेट सोडली आहे. सिनेमाच्या रिलीज अगोदर एका मुलाखती दरम्यान रणबीरने सांगितले की, त्याने आपल्या लेकिसाठी राहाकरिता स्मोकिंग आणि ड्रिंकिंग सोडलं आहे. कारण यामुळे त्याला त्रास होत असल्याचं जाणवलं आहे. उत्तम पालक होण्यासाठी त्याने सांगितले की, राहासाठी त्याला योगा आणि मेडिटेशन करायला हवं 

2/7

आमिर खान

National No Smoking Day

या यादीत पहिले नाव आहे ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे. हे नाव चाहत्यांसाठी नक्कीच आश्चर्यचकित करणारे ठरू शकते. अहवालांवर विश्वास ठेवला तर, अभिनेता एकेकाळी भरपूर धूम्रपान करायचा. मात्र, नंतर त्याची व्यसनातून सुटका झाली. सिगारेट सोडण्यासाठी आमिरच्या मुलांनी त्याला खूप मदत केल्याचीही माहिती आहे.

3/7

सैफ अली खान

National No Smoking Day

नवाब घराण्यातील बॉलिवूड स्टार सैफ अली खानलाही सिगारेट ओढण्याचे व्यसन होते. मात्र, याचे वाईट परिणामही त्याला भोगावे लागले. रिपोर्ट्सनुसार या सवयीमुळे सैफला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांनी धूम्रपानाचा कायमचा निरोप घेतला.

4/7

विवेक ऑबेरॉय

National No Smoking Day

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय देखील एकेकाळी चेन स्मोकर होता. मात्र, नंतर ती वाईट सवय मानून त्याने ती सोडून दिली. रिपोर्टनुसार, विवेक ओबेरॉयने धूम्रपान विरोधी चळवळीचा ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतर धूम्रपानाची सवय सोडली होती.

5/7

अजय देवगन

National No Smoking Day

बॉलीवूड इंडस्ट्रीचा 'सिंघम' म्हणजेच अजय देवगण देखील एकेकाळी भरपूर स्मोकिंग करायचा. रिपोर्टनुसार, 'रेड' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने आपल्या व्यसनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे त्याची धूम्रपानाची सवय बरीच कमी झाली आहे.

6/7

हृतिक रोशन

National No Smoking Day

बॉलीवूड स्टार हृतिक रोशन वयाच्या 49 व्या वर्षीही आपल्या स्मार्टनेस आणि मस्क्युलर बॉडीने तरुण स्टार्सना स्पर्धा देतो. त्याच वेळी, एक वेळ अशी होती की तो खूप धूम्रपान करत असे. मात्र, कालांतराने हृतिकलाही ते त्याच्या तब्येतीसाठी वाईट वाटू लागले आणि हळूहळू या व्यसनातून मुक्त होण्यात यश आले.

7/7

कोंकणा सेन

National No Smoking Day

या यादीत बॉलीवूड ब्युटी कोंकणा सेन शर्माच्या नावाचाही समावेश आहे. कोकणाला एकेकाळी सिगारेटचे व्यसन होते. तथापि, आई झाल्यानंतर, अभिनेत्रीने तिच्या व्यसनावर मात केली आणि आपल्या मुलाच्या भल्यासाठी धूम्रपान सोडले.