'यासारखं दुसरं सुख नाही', किरण मानेंनी हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवस

किरण मानेंनी हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

| Apr 06, 2024, 17:06 PM IST

किरण मानेंनी हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

1/7

किरण मानेंच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

'यासारखं दुसरं सुख नाही', किरण मानेंनी हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवसMarathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेल्या किरण मानेंचा वाढदिवस नुकताच पार पडला.

2/7

फोटो केले शेअर

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

किरण माने यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. यात पोस्टमध्ये त्यांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन कसे केले याबद्दल सांगितले आहेत. 

3/7

किरण मानेंची पोस्ट

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

'वाढदिवसादिवशी आपण कॅमेर्‍यासमोर असणं. एक खूप महत्त्वाची भुमिका साकारण्याचा आनंद घ्यायला मिळणं. त्याच सेटवर सगळ्या सहकलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी बर्थडे सेलिब्रेट करणं. यासारखं एका अभिनेत्यासाठी दुसरं सुख नाही!', असे किरण माने यांनी म्हटले आहे. 

4/7

'काहींना रिप्लाय देऊ शकलो नाही', किरण मानेंची भावनिक पोस्ट

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

'काल असंख्य मेसेजेस येऊन पडले. अनेक मित्रांनी, चाहत्यांनी माझ्याबद्दल भरभरुन लिहीलं. अगणित फोन्स आले. शुटिंगच्या व्यापातून वेळ काढून प्रत्येकाला उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तरीही काही फोन्स घेऊ शकलो नाही. काहींना रिप्लाय देऊ शकलो नाही. पण मला खात्री आहे, तुम्ही मला समजून घ्याल', अशी भावनिक पोस्टही किरण माने यांनी केली आहे. 

5/7

'चाहत्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलंय'

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

'तुमचं प्रेम हीच माझी ताकद आहे. मला अतोनात जीव लावणार्‍या चाहत्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलंय. संघर्षाचं सोनं केलंय. खुप कमी कलावंतांना हे भाग्य लाभतं', असेही ते म्हणाले. 

6/7

ही 'हौसला' वाढवणारी गोष्ट

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

'आपण बघतोय, भवताली विषारी वृत्तीच्या लोकांचा थयथयाट सुरू आहे. सुमारांची सद्दी आहे. त्यातून आपण आपल्या मनातला ओलावा-जिव्हाळा-आपलेपणा जपतोय. विचारांचा आणि गुणांचा आदर करतोय. ही 'हौसला' वाढवणारी गोष्ट आहे', असे किरण माने म्हणाले. 

7/7

किरण माने राजकीय क्षेत्रात सक्रीय

Marathi Actor Kiran Mane Birthday Celebration Photos share instagram post

दरम्यान किरण माने हे सध्या राजकारणात त्यांचे नशीब आजमावताना दिसत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.