Parenting Tips : तुमची मुलं हट्टी आणि रागीट आहेत? या 5 सोप्या टिप्स वापरुन मुलांचा राग करा दूर

Parenting Tips : घरात लहान मुले असली की घर कसं भरलेलं वाटतं. जर हीच मुलं हट्टी आणि रागीट असतील तर ते घर डोक्यावर घेतात. लहान मुलांच्या रागाचा सामना करणे पालकांसाठी एक आव्हान असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता आणि त्यांचा रागही शांत करु शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या लगेच जाणून घेऊ घ्या आणि मुलांमधील राग दूर करा.

| May 18, 2023, 15:18 PM IST
1/5

शांत राहा

शांत राहा

Parenting Tips : लहान मुलांच्या रागाचा सामना करणे आव्हानात्मक असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या जाणून तुम्ही तुमच्या मुलांमधील राग दूर करण्यात मदत करतील.

2/5

मुलांसाठी टाइम-आउट धोरण वापरा

मुलांसाठी टाइम-आउट धोरण वापरा

मुलांचा राग शांत होण्यासाठी त्यांचा त्यांना वेळ द्या. मुलं आणि पालक दोघांनाही शांत राहण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. राग शांत होण्यासाठी टाइम-आउट प्रभावी ठरु शकतो. टाइम-आउटसाठी स्पष्ट नियम असले पाहिजे. एखादी शांत जागा निवडणे योग्य आहे. 

3/5

एक चांगले सुरक्षित वातावरण द्या

एक चांगले सुरक्षित वातावरण द्या

मुलं त्यांच्या भावनांत जगत असतात. कधी कधी त्यांचा राग अनावर होतो आणि भांडणे होतात.  त्यांच्या भावनांचा आदर करा किंवा त्यांच्या भावना मान्य करा आणि त्यांना कळू द्या की तुम्ही समजून घेता. जर तुम्ही त्यांच्या वागण्याशी सहमत नसाल तरीही त्यांना समजून घेत आहे, हे त्याला कळले पाहिजे. त्यामुळे मुलं तुमचे ऐकण्याचे आणि समजून घेण्यास मदत करतात.

4/5

मुलांच्या भावनाचा आदर करा

मुलांच्या भावनाचा आदर करा

मुलांच्या रागाच्या वेळी शांत राहणे महत्त्वाचे आहे. रागावणे किंवा निराश होणे यामुळे प्रकरण आणखी बिघडू शकते. दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

5/5

चांगला संवाद साधा

चांगला संवाद साधा

मुलांचे नखरे रोखण्यासाठी त्यांच्याशी चांगला संवाद साधला पाहिजे. त्यांच्यावर बंधने जरुर असावीत, मात्र त्याचे त्यांना ओझे वाटू नये. त्यांच्याशी चांगला सुसंवाद साधा. त्यातून त्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून दया. मुलांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि ज्या अपेक्षा आवश्यक आहेत, ते समजून सांगा. त्यांना मर्यादा समजण्यास मदत करण्यासाठी नियम आणि परिणामही काय होतात तेही सांगा.