Periods : पीरियड्समुळे कपड्यांवरील हट्टी डाग काढणं कठीण? मग करा 'या' क्लीनिंग हॅकचा उपयोग

Periods Stains : अरे यार, यावेळी इतक्या लवकर आलेत,  'काही दिवसांपूर्वीच संपलं', बघ ना जरा माझ्या कपड्यांवर डाग तर नाही लागला आहे? पीरियड्सच्या त्रासासोबतच आपण त्याच्यासोबत कपड्यांना पडणाऱ्या दागानेही वैतागतो. 

Feb 18, 2023, 13:31 PM IST
1/6

अॅस्पिरिन

periods

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले पण अॅस्पिरिनने तुम्ही हे डाग काढ शकता. त्यासाठी अॅस्पिरिनची गोळी पाण्यात भिजवा आणि हे पाणी आता पीरियडच्या रक्ताच्या डागांवर लावा. आता हे 20 मिनिटं असच राहू द्या. त्यानंतर तो कपडा चांगला धुवून घ्या. 

2/6

व्हिनेगर

periods

व्हिनेगरचा उपयोग पण हे डाग काढून टाकण्यासाठी करु शकता. डाग असलेल्या भागावर व्हिनेगर लावा आणि अर्धा तास पाण्यात भिजवा. नंतर ते धुवून घ्या. 

3/6

कॉन्टॅक्ट लेन्सचे सोल्युशन

periods

तुमच्याकडे कॉन्टॅक्ट लेन्सचे सोल्युशन असेल तर त्याचा उपयोगही तुम्ही करु शकता. हे सोल्युशन डाग असलेल्या जागेवर लावा आणि थोड्यावेळ ते थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे सहज डाग निघून जातील.

4/6

लिंबू

periods

रक्ताचे जिद्दी डाग काढण्यासाठी लिंबू हे प्रभावी आहे. 

5/6

बेकिंग सोडा

periods

बेकिंग सोडा 30 मिनिटांसाठी रक्ताच्या डागांवर लावून ठेवा. यामुळेही हे हट्टी डाग सहज निघतील. 

6/6

थंड पाणी

periods

अनेकांचा असा समज आहे की गरम पाण्यात हट्टी डाग लवकर निघतात. पण रक्ताचे डाग काढण्यासाठी तो कपडा थंड पाण्यात ठेवा.