BJP च्या पराभवानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "आगामी काळात कर्नाटकसाठी.."

PM Modi On Congress Karnataka Win: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा कर्नाटकचे दौरे केले होते. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र कर्नाटकमध्ये मोदींचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारत भाजपाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय पाहूयात...

| May 13, 2023, 20:07 PM IST
1/9

PM Modi On Congress Karnataka Win

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अभुतपूर्व विजय मिळवला आहे. काँग्रेसने येथे केवळ बहुमताचा आकडाच ओलांडला नाही तर 1989 नंतरच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम केला आहे. काँग्रेसने 137 जागा जिंकल्या आहेत. 

2/9

PM Modi On Congress Karnataka Win

डी शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने भाजपाला पराभूत केलं आहे. या पराभवाबरोबर दाक्षिणात्य राज्यांपैकी एकमेव राज्यातील सत्ताही भाजपाने गमावली आहे. भाजपाला 2018 च्या निवडणुकांपेक्षा यंदा तब्बल 40 जागांचा फटका बसला आहे. भाजपाला 65 जागांवर समाधान मानावलं लागलं आहे.

3/9

PM Modi On Congress Karnataka Win

काँग्रेसच्या या विजयानंतर संपूर्ण कर्नाटकबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही कर्नाटकमधील विजय साजरा केला जात आहे. अनेक जागी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून, ढोल वाजवून, नाचून आनंद साजरा केला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विजयाला जल्लोष साजरा करण्यात आला.

4/9

PM Modi On Congress Karnataka Win

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजपाच्या या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधान मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेकसभा घेतल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवारांचा प्रचारही केला होता.

5/9

PM Modi On Congress Karnataka Win

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मोदींच्या अनेक सभा कर्नाटकमध्ये झाल्या. मात्र कर्नाटकच्या जनतेने प्रत्येक विधानसभा निवडणुकीला सत्ताधारी बदलण्याचा ट्रेण्ड कायम ठेवत काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र भाजपा आणि काँग्रेसमधील विजयी जागांचं अंतर फार अधिक आहे. 

6/9

PM Modi On Congress Karnataka Win

काँग्रेसच्या या विजयानंतर नरेंद्र मोदींनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया देताना काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीमधील विजयासाठी काँग्रेस पक्षाचं अभिनंदन," असं मोदी म्हणाले आहेत.

7/9

PM Modi On Congress Karnataka Win

लोकांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी माझ्याकडून त्यांना अनेक शुभेच्छा, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरुन काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

8/9

PM Modi On Congress Karnataka Win

मोदींनी भाजपाचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा समर्थकांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. "कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. मी भाजपा कार्यकर्त्यांच्या कष्टाचं कौतुक करतो," असं मोदींनी म्हटलं आहे. 

9/9

PM Modi On Congress Karnataka Win

"आगामी काळामध्ये कर्नाटकसाठी आपण अधिक कष्टाने काम केलं पाहिजे," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी कर्नाटकमधील कार्यकर्त्यांना केलं आहे.