कपाळावर गंध, गळ्यात उपरण...; प्रियांका-निकने लेकीसह घेतले अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन

प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून ती लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात झळकणार आहे. 

Mar 20, 2024, 18:09 PM IST

प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून ती लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात झळकणार आहे. 

1/8

सध्या प्रियांका चोप्रा भारतात

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही सध्या भारतात आहे. मुंबईतील एका कार्यक्रमासाठी तिने हजेरी देखील लावली होती.

2/8

प्रियांका चोप्राने सहकुटुंब घेतले रामलल्लाचं दर्शन

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

आता प्रियांका चोप्राने पती निक जोनस आणि लेक मालतीसह अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतले. यामुळे ती चर्चेत आली आहे.  

3/8

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

प्रियांका चोप्रा आणि निकच्या अयोध्या प्रभू श्रीराम मंदिरातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

4/8

प्रियांकासह निकचा पारंपारिक अंदाज

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

यावेळी प्रियांकासह निकदेखील पारंपारिक पोशाखात पाहायला मिळत आहे. 

5/8

प्रियांकाने परिधान केली पिवळ्या रंगाची साडी

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर निकने शेरवानी परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच प्रियांकाची लेक मालतीनेही सुंदर फ्रॉक घातल्याचे पाहायला मिळत आहे. 

6/8

कपाळावर गंध, उपरणं घालत जंगी स्वागत

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

प्रियांका आणि निकने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे कपाळावर गंध, उपरणं घालत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  

7/8

‘द बल्फ’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

दरम्यान प्रियांका ही लवकरच ‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या पुढील सीझनमध्ये झळकणार आहे. त्यासोबतच ‘द बल्फ’ हा तिचा हॉलिवूड चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

8/8

लवकरच झळकणार ‘जी ले जरा’ चित्रपटात

Priyanka Chopra offered prayers at Ram Mandir in Ayodhya with Nick Jonas and daughter Maltie See Photos

त्यासोबतच लवकरच ती पुन्हा एकदा हिंदीत कमबॅक करणार आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात झळकणार असून यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅतरिना कैफही दिसणार आहेत.