टीम इंडियासाठी हेड कोच पदावर भरती; BCCI च्या नेमक्या अटी काय?

Indian Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन कोचपदासाठी जाहिरात जारी केली आहे. सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहेत.  

| May 14, 2024, 11:50 AM IST
1/7

सध्या वरिष्ठ पुरुषांच्या टीमचे कोच राहुल द्रविड आहेत. त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्डकपनंतर संपुष्टात येणार आहे.

2/7

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाला नवा मुख्य कोच मिळू शकतात. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

3/7

बीसीसीआयने सोमवारी रात्री उशिरा मुख्य कोच पदाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. यावेळी उमेदवार सोमवार, 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. 

4/7

प्रशिक्षकांसाठी निवड प्रक्रिया अर्जांची नीट माहिती घेतली जाईल. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत होणार आहे.

5/7

बीसीसीआयने मुख्य कोचपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत. 

6/7

किमान 30 टेस्ट किंवा 50 वनडे सामने खेळण्याचा अनुभव असला पाहिजे. फुल मेंबर टेस्ट प्लेइंग नेशनचे कमीत कमी 2 मुख्य प्रशिक्षक असले पाहिजेत.

7/7

किमान 3 वर्षे एसोसिएट मेंबर किंवा प्रथम श्रेणी टीमचे सहयोगी सदस्य किंवा मुख्य प्रशिक्षक असणं आवश्यक आहे. BCCI स्तर 3 किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं.