Rishabh Pant चं निलंबन, आरसीबीविरुद्ध कोण असेल दिल्लीचा कॅप्टन? रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याला बीसीसीआयने 30 लाखांचा दंड ठोठावला असून त्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्यासाठी निलंबित देखील केलं आहे.

| May 11, 2024, 22:40 PM IST

Axer patel will lead in DC vs RCB Match : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ऋषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने ठरवून दिलेल्या वेळेत गोलंदाजी पूर्ण केली नाही. (Rishabh Pant suspended Axer patel will lead in DC vs RCB Match)

1/7

ऋषभ पंत निलंबित

ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2/7

पंचाचा कौल योग्य

मॅच रेफरीच्या निर्णयाला दिल्ली कॅपिटल्स संघानेही आव्हान दिलं होतं. मात्र, बीसीसीआयने चौकशी केल्यानंतर पंचाचा निर्णय योग्य असल्याचा कौल दिला.

3/7

बीसीसीआय

आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार ऋषभ पंतवर कारवाई करण्यात आल्याचं बीसीसीआयने निवेदनात म्हटलं आहे.

4/7

बंगळुरूविरुद्ध सामना

बीसीसीआयच्या कारवाईमुळे आता त्याला आगामी रॉयल चॅलेजर्स बंगळुरूविरुद्ध खेळता येणार नाही.

5/7

कॅप्टन्सची घोषणा

दिल्लीच्या प्लेऑफच्या दृष्टीकोणातून हा सामना महत्त्वाचा असणार आहे. अशातच आता दिल्लीने या सामन्याच्या कॅप्टन्सची घोषणा केलीये.

6/7

अक्षर पटेल

दिल्लीचा संघ आयसीबीविरुद्ध अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळेल, अशी माहिती दिल्लीचे कोच रिकी पॉटिंगने दिली आहे.

7/7

प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर...

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत झालेल्या 12 सामन्यांपैकी 6 जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.